Beed Crime: गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:16 IST2025-05-15T13:16:19+5:302025-05-15T13:16:54+5:30
बीडमध्ये रिलेशनशिपचा धक्कादायक शेवट: तरुणीला घरात घुसून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ

Beed Crime: गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य
बीड : खासगी रुग्णालयात काम करणारे दोघेजण तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न उचलल्याने तिला पहाटेच्या सुमारास घरात घुसून गळा दाबत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिच्या दाजीला ही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास स्वराज्यनगर भागात घडला. याप्रकरणी दारूड्या तरूणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण सपकाळ (वय २५ रा. सुर्डी ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही वडवणी तालुक्यातील रहिवासी असून लक्ष्मण व ती एकाच खासगी रूग्णालयात काम करतात. तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे फोनवर ही बोलणे होत असे. लक्ष्मण हा पीडिता सध्या बीडमध्ये राहत असलेल्या किरायाच्या घराकडेही चकरा मारत असे. १२ मे रोजीही तो दारूच्या नशेत होता. मला तुझ्या रूमवर यायचे आहे, असे म्हणत तो पीडितेला त्रास देत होता. तिने सकाळी ये म्हणल्यानंतर ही लक्ष्मण ऐकले नाही.
पहाटे ४ वाजताच तो पीडितेच्या रूमवर गेला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत गळ्याला पकडून मला चापटाने मारहाण केली. तू माझा फोन रिसिव्ह का करत नाहीस, असे म्हणून मला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेने तिच्या दाजीला बोलावून घेतले. यावेळी त्यांनाही तुझा काय संबंध आहे आमच्यामध्ये का बोलतोस, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.