Beed Crime: कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:54 IST2026-02-11T17:53:58+5:302026-02-11T17:54:25+5:30

ऊसतोड टोळीतीलच नराधमाने ओलांडली सीमा, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

Beed Crime: Tractor driver abuses sugarcane worker's child, threatening to use sickle | Beed Crime: कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार

Beed Crime: कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार

- मधुकर सिरसट
केज (बीड):
पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून ऊसतोडणीसाठी आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परभणी जिल्ह्यातून केज तालुक्यात कामासाठी आलेल्या एका ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच टोळीतील नराधम ट्रॅक्टर चालकाने कोयत्याचा धाक दाखवून दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

भरदिवसा कोयत्याच्या जोरावर कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज अशोक खरात (रा. जामरून, ता. जिंतूर, जि. परभणी) हा त्याच टोळीत ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास सुर्डी शिवारातील एका कोपीत मुलीला एकटे गाठून त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हादगाव शिवारात त्याने पीडितेवर बळजबरी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या चिमुकलीने अखेर आपल्या आईला हा थरार सांगितला.

आरोपी ट्रॅक्टर सोडून पसार 
पीडितेच्या आईने हिंमत दाखवत मंगळवारी रात्री उशिरा युसूफवडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम सूरज खरात आपला ट्रॅक्टर हादगाव शिवारात सोडून फरार झाला आहे. सध्या 'पिंक पथका'चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.

Web Title : बीड: ट्रैक्टर चालक ने नाबालिग गन्ना श्रमिक पर किया हमला, हंसिया से धमकाया।

Web Summary : बीड में, एक ट्रैक्टर चालक ने 13 वर्षीय नाबालिग गन्ना श्रमिक पर हंसिया से धमकाकर यौन हमला किया। पीड़िता की मां द्वारा पुलिस में शिकायत दर्ज कराने के बाद आरोपी फरार है। पुलिस पोक्सो एक्ट के तहत मामले की जांच कर रही है।

Web Title : Beed: Tractor driver assaults minor sugarcane worker, threatens with sickle.

Web Summary : In Beed, a tractor driver sexually assaulted a 13-year-old sugarcane worker, threatening her with a sickle. The accused is absconding after the victim's mother filed a police complaint. Police are investigating the case under the POCSO Act.