शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा डाव अंगाशी आला, बीडमध्ये टॉवर कोसळून तारा चोरणाऱ्या पुण्याच्या दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:25 IST

तारांच्या चोरीसाठी पुण्यातून आले अन् जीव गमावून बसले; केज तालुक्यातील दुर्घटनेने उडाली खळबळ.

- मधुकर सिरसटकेज (बीड): धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील नांदूरघाट शिवारात विजेच्या तारांची चोरी करण्याच्या प्रयत्नात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हायव्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढून एका बाजूची तार तोडताच, टॉवर विरुद्ध दिशेला कोलमडून पडल्याने ही भीषण दुर्घटना घडली. रविवारी (दि. २९) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन तरुण जागीच ठार झाले, तर त्यांचे दोन साथीदार थोडक्यात बचावले आहेत.

अविनाश बटोळे (वय १७) आणि आकाश श्रीराम आडे (दोन्ही रा. मेदनकरवाडी, चाकण, जि. पुणे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

चोरीचा बनाव अन परभणीत 'हायव्होल्टेज' ड्रामामिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या चाकण परिसरातील सहा जण एका कारमधून चोरीच्या उद्देशाने नांदूरघाट शिवारात आले होते. 'टोरँटो' कंपनीच्या टॉवरवरील तारा कापण्यासाठी चौघे जण वर चढले, मात्र टॉवर कोसळल्याने दोघांचा अंत झाला. घटनेनंतर घाबरलेल्या साथीदारांनी अपघाताचा बनाव रचला आणि दोन्ही मृतदेह कारमध्ये टाकून थेट परभणी गाठली. तिथे मृतदेह सोडून साथीदार पसार झाले, मात्र नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने या संपूर्ण चोरीचे बिंग फुटले.

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणीघटनेची माहिती मिळताच केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिथे रक्ताचे डाग, पादत्राणे आणि पाण्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्या. बीड येथील फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाला भेट देऊन रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांचा कसून तपास सुरूया प्रकरणात कार चालक सुरज राजू गिराम याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. पुण्यातून बीडमध्ये येऊन अशा प्रकारे विजेच्या तारांची चोरी करणारी ही टोळी मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात भीतीसह चर्चेला उधाण आले असून, पोलीस आता पसार झालेल्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Theft backfires: Two die stealing wires; high-voltage tower collapses.

Web Summary : Two men died in Beed while stealing electrical wires. They climbed a high-voltage tower, which collapsed after a wire was cut. Two accomplices fled, attempting to cover up the crime by abandoning the bodies in Parbhani. Police are investigating the incident.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात