Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:20 IST2025-05-17T10:19:28+5:302025-05-17T10:20:14+5:30
Beed Crime News : परळीत १२ तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Beed Crime News ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हे समोर आले. दरम्यान, आता परळीतील मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये १२ तरुणांनी एकाला मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव हनुमान दिवटे असं आहे. त्याला समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली असून मारहाण करत असताना या तरुणांनी त्याचा व्हिडीओ बनवला.
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं"
या व्हिडीओमध्ये शिवराज जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. शिवराजच्या बाजूने समाधान मुंडेसह अन्य तरुणांनी कडे केले आणि समाधान मुंडे याने काठी आणि बाबूंने मारहाण केली. यावेळी शिवराज मोठ्या ओरडून मारु नका अशी विनंती करत आहे. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ( Beed Crime News )
हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमातून परतताना अपहरण
शिवराज हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेला होता. तो परतत असताना त्याचे पेट्रोल पंपापासून अपहरण केले. त्याला टोकवाडीतल्या रत्नेश्वर मंदिर परिसराजवळ घेऊन गेले. तिथे असलेल्या झाडींमध्ये त्याला कडे करुन मारहाण केली.
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी समाधान मुंडेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
आज परळी वैद्यनाथमधी पुन्हा स्व संतोष आण्णा देशमुख होता होता राहीला.लिबोटा गोपीनाथगड तालुका परळी वैद्यनाथ येथील मराठासेवक नारायण दिवटे पाटील याचा मुलगा.आज जलालपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता आल्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी गेला..read👇#Beedcrime#Beedhatyakand#Beedpolicepic.twitter.com/6YRSKZ9w22
— Mahesh Andhale Official (@OfficialAndhal1) May 16, 2025