परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:22 IST2026-02-23T18:14:20+5:302026-02-23T18:22:05+5:30

महादेव मुंडे कुटुंबाला धोका? मुलाला मारहाण होताच पत्नीने मागितले संरक्षण, गृहमंत्री आणि एसपींना सुप्रिया सुळेंचे पत्र

Beed Crime: Late Mahadev Munde’s Son Assaulted in Parli; Supriya Sule Demands Police Protection | परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण

परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण

परळी : व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणाला २८ महिने उलटूनही एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नसताना मुंडे यांच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील माधवबाग येथील शिकवणीवरून घरी परतणाऱ्या मुंडे यांच्या आठवीतील मुलास सोमेश्वरनगर परिसरात गुरुवारी अज्ञात युवकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव महादेव मुंडे असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे.

परळी शहरातील महादेव मुंडे खून प्रकरण एकीकडे राज्यभर गाजत असताना दुसरीकडे मुंडे यांची प्रणव व प्रवीण ही दोन मुले १९ फेब्रुवारी रोजी शहरातील माधवबाग येथे शिकवणीला गेली होती. शिकवणीनंतर ती घरी परतत असताना अज्ञात युवकाने शिवीगाळ करून प्रणव याच्या पाठीवर हातातील कडे फेकून मारल्याची घटना घडली. मारहाण करणारा युवक बालाजी आघाव असल्याचा संशय प्रणव याने व्यक्त केला आहे. मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी प्रणव मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरी मुंडेंनी संरक्षणासाठी २० फेब्रुवारीला दिले पत्र
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्येचा तपास सुरू असतानाच आता कुटुंबीयांना दमदाटी केली जात असल्याचे सांगत २० फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांना पत्र देऊन कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

खासदार सुळे यांच्याकडून पोलिस संरक्षणाची मागणी
राष्ट्रवादी (शरद पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्याचे गृहमंत्री आणि बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना मुंडे कुटुंबीयांना त्वरित आणि पुरेसे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Web Title : परली में दहशत: मारे गए व्यापारी के बेटे पर हमला, पत्नी ने मांगी सुरक्षा

Web Summary : व्यापारी महादेव मुंडे की हत्या के 28 महीने बाद, उनके बेटे पर हमला हुआ। पत्नी ने कथित धमकी के कारण पुलिस सुरक्षा मांगी। सांसद सुप्रिया सुले ने भी मुंडे परिवार के लिए सुरक्षा का अनुरोध किया।

Web Title : Parli Shaken: Murdered Trader's Son Attacked, Wife Seeks Protection

Web Summary : 28 months after trader Mahadev Munde's murder, his son was attacked. His wife seeks police protection due to alleged intimidation. MP Supriya Sule also requested protection for the Munde family.