Beed: मस्साजोग शिवारातून 30 लाखांचा गुटखा जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:15 IST2025-09-26T18:14:18+5:302025-09-26T18:15:30+5:30
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची केज तालुक्यात कारवाई

Beed: मस्साजोग शिवारातून 30 लाखांचा गुटखा जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- मधुकर सिरसट
केज ( बीड): पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या आदेशानुसार बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने राज्य शासनाने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मस्साजोग शिवारात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 30 लाख 46 हजार 227 रुपयाचा गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा आणि 4 लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
य प्रकरणी बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अनंत मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रोहित आसाराम देशमुख ( 35 वर्ष रा. मस्साजोग), साहेबराव लिंबा आंधळे ( 45 वर्ष रा.आंधळ्याचीवाडी) या दोन्ही आरोपीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे करीत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.
यांच्या पथकाने केली ही कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, व त्यांचा पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस अंमलदार अनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, राख, अश्फाक सय्यद, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड यांच्या पथकाने केली.