Beed Crime: मुलाला शोधत टोळके घरात शिरले; आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:56 IST2025-06-30T11:55:38+5:302025-06-30T11:56:05+5:30

मुलाचा काही तरुणांशी पूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून हे टोळके रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले.

Beed Crime: Gang enters house looking for child; parents beaten at knifepoint | Beed Crime: मुलाला शोधत टोळके घरात शिरले; आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण

Beed Crime: मुलाला शोधत टोळके घरात शिरले; आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण

बीड : बीड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने टोक गाठले आहे. शाहूनगर भागातील गजानन कॉलनीमध्ये तब्बल ३० ते ४० जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर मध्यरात्री हल्ला चढवत दगड आणि चाकूचा वापर करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दिनकर आडागळे आणि त्यांच्या पत्नी रेणुका आडागळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आडागळे कुटुंबाच्या मुलाचा काही तरुणांशी पूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून हे टोळके रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले. "तुमचा मुलगा कुठे लपलाय?" असा जाब विचारत आरोपींनी चाकूचा धाक दाखवून घरातील साहित्याची तोडफोड केली आणि कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. आडागळे यांच्या मुलीवर देखील चाकू उगारण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याची तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड हादरून गेला होता. अशातच पुन्हा घडलेली ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे बोट दाखवते.

Web Title: Beed Crime: Gang enters house looking for child; parents beaten at knifepoint