अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; नराधम भावासह त्याला साथ देणाऱ्या बहिणीला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:43 IST2026-03-13T15:39:47+5:302026-03-13T15:43:13+5:30

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Beed Crime: Court Sentences Brother and Sister to 10 Years Imprisonment for Kidnapping and Molesting Minor Girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; नराधम भावासह त्याला साथ देणाऱ्या बहिणीला कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; नराधम भावासह त्याला साथ देणाऱ्या बहिणीला कारावास

बीड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी जीवन रघुनाथ सरवदे (रा.इंद्रप्रस्थ कॉलनी, बालेपीर, ता.जि.बीड) आणि आरोपीस गुन्ह्यात सहकार्य केल्याबद्दल आरोपी नामे सारिका रामेश्वर भोसले, (ह.मु. एकता कॉलनी, गणेशनगर शास्त्री चौक, भोसरी, पुणे) यांना दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.-१ तथा विशेष न्या.व्ही.एच. पाटवदकर यांच्या न्यायालयाने सुनावली. आरोपी नात्याने भाऊ-बहीण आहेत.

जीवन सरवदे हा मिस्त्री काम करायचा. त्याने पीडितेचा मोबाइल नंबर घेतला आणि दोघे व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्रामवरून व फोन करून बोलू लागले. त्यामुळे त्यांची चांगली ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जीवन सरवदे याने पीडितेला बीड येथून २० मे २०२२ रोजी पुण्यातील भोसरी येथे बहीण सारिका हिच्या घरी नेले. तेथे १५ दिवस पीडितेला एका रूममध्ये डांबून ठेवले. तेथे तिची इच्छा नसताना जीवन याने बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध केले, अशी फिर्याद पीडितेच्या वडिलांनी दिली. त्यानुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६(अ), ३७६(२)(जे)(एन) भादंवि आणि कलम ४, १७ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम.बी. तुपे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्या.-१ तथा विशेष न्या.व्ही.एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच पीडितेचा जबाब, वैद्यकीय पुरावा व कागदपत्रांवरून आणि साहाय्यक सरकारी वकील अमित पी. हसेगांवकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जीवन आणि त्याची बहीण सारीका यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या प्रकरणात साहाय्यक सरकारी वकील हसेगावकर यांना कोर्ट पैरवी साहाय्यक फौजदार पी.एस. गव्हाणे, कोर्ट ड्युटी पोलिस कर्मचारी रंजना बरडे यांनी सहकार्य केले.

Web Title : नाबालिग लड़की से दुर्व्यवहार मामला: भाई, बहन को मिली कारावास की सजा

Web Summary : नाबालिग लड़की के यौन शोषण के मामले में एक व्यक्ति और उसकी बहन को दस साल की कैद की सजा सुनाई गई। आदमी ने पीड़िता को अपनी बहन के पुणे स्थित घर पर बहला-फुसलाकर लाया और उसके साथ मारपीट की। अदालत ने सबूतों और गवाहों के बयानों के आधार पर दोनों को दोषी ठहराया।

Web Title : Minor Girl Abuse Case: Brother, Sister Jailed for Complicity

Web Summary : A man and his sister were sentenced to ten years imprisonment for the sexual abuse of a minor. The man lured the victim to his sister's Pune home and assaulted her. The court convicted both based on evidence and witness testimonies.