Beed Crime: आष्टीत दोन इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना बेड्या, घातपाताचा संशय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:48 IST2026-02-20T11:48:20+5:302026-02-20T11:48:33+5:30
आष्टी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दोन पिस्तुलं जप्त केले, घातपाताचा कट उधळला?

Beed Crime: आष्टीत दोन इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना बेड्या, घातपाताचा संशय?
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : इंग्लिश बनावट पिस्तूल घेऊन चारचाकी वाहनाने ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्याने येत असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून चारचाकीसह दोघांना ताब्यात घेतले असून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्याची कारवाई गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान केली.
आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून काही व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच या रस्त्यावर सापळा लावून गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान राहूल खोटे रा.मूगगाव,अमृत भोसले रा.पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड या दोघेजणांना ताब्यात घेऊन दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत अटक करण्यात आली आहे.यात इतर आरोपीचा देखील समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घातपातासाठीची तयारी नव्हती ना?
सदरील आरोपीकडे दोन पिस्तूल मिळून आल्याने या पिस्तूल च्या माध्यमातून काही घातपात घडवला जाणार होता की काय? किवा तशी तयारी तर नव्हती ना याचा शोध आता आष्टी पोलिस घेत आहेत. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे,पोलिस निरीक्षक शरद भुतेकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, नितीन काकडे,गणेश जगताप, परमेश्वर तागड,बब्रुवाण वाणी यांनी केली.