ट्रॅव्हल्सने कट मारला अन् सळईने भरलेला कंटेनर घरावर उलटला; चालकाचा अंत, कुटुंब बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:29 IST2026-03-25T12:28:06+5:302026-03-25T12:29:09+5:30

झोपेत असताना घरावरून गेला कंटेनर, आष्टी तालुक्यातील भीषण अपघातात तरुण चालकाचा बळी

Beed Crime: Ashti Accident: Travels 'Cut' Leads to Fatal Container Crash; 24-Year-Old Driver Killed on Beed-Ahilyanagar Highway | ट्रॅव्हल्सने कट मारला अन् सळईने भरलेला कंटेनर घरावर उलटला; चालकाचा अंत, कुटुंब बचावले!

ट्रॅव्हल्सने कट मारला अन् सळईने भरलेला कंटेनर घरावर उलटला; चालकाचा अंत, कुटुंब बचावले!

कडा (जि. बीड): बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कारखेल खुर्द (ता. आष्टी) येथे सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. पुण्यावरून लोखंडी सळई घेऊन लातूरकडे जाणाऱ्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने 'कट' मारल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर उलटला. या दुर्दैवी घटनेत चालक ज्ञानदेव गर्जे (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी प्रवीण सोनवणे हा किरकोळ जखमी झाला आहे.

रस्त्यालगतची चार कुटुंबांचे नशीब बलवत्तर
हा अपघात इतका भीषण होता की, ताबा सुटलेला कंटेनर रस्त्यालगत असलेल्या घरांच्या दिशेने गेला. घरासमोरील ओटे, पत्रे आणि झाडांना धडक देत कंटेनर थांबला. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. कंटेनर घराच्या आत शिरला असता तर मोठा अनर्थ घडला असता, मात्र सुदैवाने चार कुटुंबांचे नशीब बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अंभोरा पोलिसांकडून पंचनामा
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे हवालदार हरिभाऊ बांगर, शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत ज्ञानदेव गर्जे हा मूळचा आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील रहिवासी असून तो मालवाहतूक वाहनावर चालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाढत्या वेगामुळे अशा घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Web Title : ट्रैवलर की वजह से कंटेनर घर में घुसा; ड्राइवर की मौत

Web Summary : कारखेल खुर्द के पास एक ट्रैवलर की वजह से कंटेनर ट्रक एक घर में घुस गया, जिससे ड्राइवर की मौत हो गई। घर में मौजूद परिवार बच गया। ड्राइवर ज्ञानदेव गर्जे की मौके पर ही मौत हो गई। पुलिस घटना की जांच कर रही है, अत्यधिक गति को कारण बताया जा रहा है।

Web Title : Traveler's Cut Causes Container Truck to Crash into House; Driver Dies

Web Summary : A container truck driver died near Karkhel Khurd after a traveler's bus cut him off, causing the truck to crash into a house. The family inside survived. The driver, Dnyandev Garje, died on the spot. Police are investigating the incident, blaming excessive speed.