शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संशय आल्याने टाळले, पण एसीबीने गाठले! शेतकऱ्याला लाच मागणारा पोलिस घरातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:39 IST

पोलीसच निघाला लाचखोर! दोन महिन्यांनंतर लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचा 'करेक्ट कार्यक्रम'

बीड : शेतातून ऊसाचा ट्रॅक्टर जाऊ देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी, दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. दत्ता नागनाथ निघूळ (वय ३६, रा. पोलीस निवास, सिरसाळा) असे या लाचखोर पोलिसाचे नाव असून, मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याला त्याच्या निवासस्थानातूनच ताब्यात घेण्यात आले.

सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतकऱ्याचा ऊसाचा ट्रॅक्टर शेतातून जाऊ दिला जात नव्हता. याबाबत शेतकऱ्याने तहसीलदारांकडे दाद मागितली होती. तहसीलदारांनी या प्रकरणात मदत करण्यासाठी सिरसाळा पोलिसांना अधिकृत पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे दत्ता निघूळ याला संबंधित गावात पाठविण्यात आले होते. मात्र, ट्रॅक्टरचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी निघूळ याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. हा प्रकार २७ जानेवारी २०२६ रोजी घडला होता.

संशय आल्याने टाळले, पण एसीबीने गाठले!लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. दरम्यान, निघूळ याला तक्रारदारावर संशय आला, त्यामुळे त्याने फोन घेणे आणि भेटणे टाळले होते. मात्र, एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली होती. मंगळवारी दुपारी संधी मिळताच बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने निघूळ याला पोलीस निवासातून अटक केली. दत्ता निघूळ याच्यावर आता त्याच्याच सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठाणेदार दहिफळे अडचणीतसिरसाळा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांचा मागील आठवड्यातच एका वकिलाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचा वकिल संघाकडून निषेध करत कारवाईची मागणी केली होती. परंतू वरिष्ठांनी त्यांना पाठिशी घातले. आता याच ठाण्यातील कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडे दोन हजार रूपयांची लाच मागितली आहे. आता दहिफळे यांचीही उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात बदली होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bribery suspicion led to avoidance, but ACB caught cop!

Web Summary : A police officer in Beed was arrested for demanding a bribe of ₹2,000 from a farmer. Dattatray Nighul was caught at his residence after an ACB investigation confirmed the bribe demand. His superior might face consequences.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस