शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Beed: घरामागे खेळताना ओढवले संकट; अडीच वर्षांच्या चिमुरडीवर १३ वर्षीय मुलाचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:41 IST

आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने अंबाजोगाई हादरले 

अंबाजोगाई (जि. बीड): बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर गावातीलच १३ वर्षीय शाळकरी मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ३१ मार्च रोजी घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच अशाच एका घटनेत एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

घरामागील मैदानात ओढवले संकटमिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित चिमुरडी तिच्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत होती. यावेळी गावातीलच १३ वर्षीय मुलाने तिला गाठून तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यामुळे चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या आईने १ एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

आठवडाभरातील दुसरी घटना; पोलीस यंत्रणा सतर्कअंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या पाच दिवसांपूर्वी दोन वर्ष पाच महिने वय असलेल्या चिमुरडीवर १५ वर्षांच्या मुलाने अश्लील व्हिडीओ पाहून अत्याचार केला होता, ज्यात पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.

बाल गुन्हेगारी आणि मोबाईलचा विळखाअल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमागे मोबाईलवरील अश्लील साहित्य आणि संस्कारांचा अभाव कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सलग दोन घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस आता या दोन्ही प्रकरणांतील आरोपींच्या पार्श्वभूमीची अधिक चौकशी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Minor Girl Assaulted; 13-Year-Old Boy Accused in Heinous Crime

Web Summary : In Beed's Ambajogai, a shocking incident occurred where a 13-year-old allegedly sexually assaulted a two-and-a-half-year-old girl. Police have registered a case, sparking outrage. This follows a recent similar case, raising concerns about juvenile crime and the influence of inappropriate content.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण