Beed: अपघात की घातपात? सासरच्यांशी वादानंतर केजकडे निघालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:17 IST2025-06-26T17:16:11+5:302025-06-26T17:17:26+5:30

अपघाताच्या आधी सासरच्यांशी भांडण; आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाच्या मृत्यूवरून संशय

Beed: Accident or murder? Suspicious death of a young man who went to the cage after a dispute with his in-laws | Beed: अपघात की घातपात? सासरच्यांशी वादानंतर केजकडे निघालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Beed: अपघात की घातपात? सासरच्यांशी वादानंतर केजकडे निघालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

- मधुकर सिरसट
केज ( बीड) :
चिंचोलीमाळी (ता. केज) येथील ३० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी घडली. संपत शिवाजी राऊत असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र, या अपघाताला केवळ चुकून घडलेली दुर्घटना मानावे की पूर्वनियोजित घातपात, याबाबत मृताच्या कुटुंबियांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे. 

मृत युवकाचे नाव संपत शिवाजी राऊत (३०, रा. चिंचोलीमाळी) असे आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून केजकडे जात असताना टाकळी शिवारातील एका वळणावर त्याची दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात हलवला.

परंतु या मृत्यूमागील पार्श्वभूमी लक्षात घेतली असता, ही केवळ अपघाताची घटना नसून घातपात असावा, असा संशय मृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. संपत राऊत याने दोन वर्षांपूर्वी गावातीलच दुसऱ्या समाजातील मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहामुळे त्याचे सासरच्यांशी संबंध तणावपूर्ण होते. बुधवारी दुपारी सासरच्या मंडळींशी त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर ते केज पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निघाले, ही माहिती मिळताच संपत दुचाकीवरून केजकडे निघाला होता. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

घातपात की अपघात?
या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत युवकाचे वडील शिवाजी राऊत व भाऊ विशाल राऊत यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा ठाम आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पंचनामा व तपास प्रक्रिया काही काळासाठी रखडली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी गुरुवारी दुपारी अडीच वाजता करण्यात आली, त्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली.

Web Title: Beed: Accident or murder? Suspicious death of a young man who went to the cage after a dispute with his in-laws