बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्या अतुल भातखळकरांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 19:56 IST2021-02-15T19:51:56+5:302021-02-15T19:56:34+5:30
Pooja Chavan suicide case बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने येथील शहर पोलिस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले आहे.

बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्या अतुल भातखळकरांवर गुन्हा दाखल करा
परळी- बंजारा समाजाच्या भावना दुखावतील असे जातीवाचक शब्द प्रसार माध्यमावर वापरल्याबद्दल भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी परळी शहर पोलिसांकडे केली आहे.
बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने येथील शहर पोलिस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले आहे. यावेळी बंजारा समाजाचे नेते बाळासाहेब उर्फ पपू चव्हाण , डी एस राठोड,विनायक राठोड, विजय राठोड , प्रकाश चव्हाण, अरुण पवार,वैजनाथ चव्हाण,संतोष राठोड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पूजा चव्हाण प्रकरणात समाजाची बदनामी केली जात आहेत. ही बदनामी सहन केली जाणार नाही, बंजारा समाजा विषयी भावना दुखावतील असा शब्द वापरल्या प्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा परळी बंजारा समाजाने दिला असल्याची माहिती युवक नेते बाळासाहेब उर्फ पपू चव्हाण यांनी बोलताना दिली.