परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST2021-01-22T04:30:34+5:302021-01-22T04:30:34+5:30

परळी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे टोकवाडी येथील बालाजी मुंडे यांची गुरुवारी ...

Balaji Munde as the Chairman of Parli Panchayat Samiti | परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे

परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे

परळी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे टोकवाडी येथील बालाजी मुंडे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परळी पंचायत समितीच्या नूतन सभापतीच्या निवडीसाठी २१ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ऊर्मिला गित्ते यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आल्यानंतर सभापती पदाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही विशेष सभा घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे उपस्थित होत्या. सभापती पदासाठी बालाजी मुंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे. या विशेष सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य उपस्थित होते. भाजपचे तीन सदस्य यावेळी उपस्थित नव्हते.

येथील पंचायत समितीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे वर्चस्व असून त्यांच्या सूचनेनुसारच बालाजी मुंडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. मुंडे हे पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यांना सभापती करून राष्ट्रवादी काँग्रेसने बढती दिली आहे. ते टोकवाडी येथील रहिवासी आहेत. नूतन सभापती बालाजी मुंडे यांचे ना. धनंजय मुंडेंचे यांच्या येथील जगमित्र कार्यालयामध्ये बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे व तसेच परळी नप गटनेते वाल्मीक कराड यांनी स्वागत केले.

Web Title: Balaji Munde as the Chairman of Parli Panchayat Samiti