वातावरण बदलले, आशा बळावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:09+5:302021-07-07T04:42:09+5:30

... नियमभंग करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई शिरूर कासार : सोमवारी शिथिलतेची वेळ संपल्यानंतरही काही दुकाने उघडी होती. सहज फेरफटका मारीत ...

The atmosphere changed, hopes were raised | वातावरण बदलले, आशा बळावल्या

वातावरण बदलले, आशा बळावल्या

...

नियमभंग करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

शिरूर कासार : सोमवारी शिथिलतेची वेळ संपल्यानंतरही काही दुकाने उघडी होती. सहज फेरफटका मारीत असताना तहसीलदार श्रीराम बेंडे यांना काही दुकाने उघडी असल्याचे निदर्शनास आले. बेंडे यांनी सदरील दुकानांचे शटर बंद करायला लावून चावी सोबत नेली. नियमाप्रमाणे दिलेल्या वेळेत दुकाने बंद करावीत अन्यथा कारवाई केली जाईल, असे आवाहन बेंडे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.

....

वारकरी देहाने घरीच, पण ध्यास पंढरीचाच

शिरूर कासार : वारकऱ्यांसाठी ज्ञानोबा, तुकोबा सोबत पायी वारी करणे ही महापर्वणी मानली जाते. परंतु गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी त्याला कोरोनाने अडवले आहे. तो देहाने घरी असला तरी मनाने तो पायी वारीत असल्याचे जाणवते. पहाटेपासूनची घाई आणि त्यानंतरचा सगळा क्रम त्याला डोळ्यासमोर दिसतो. भजनाचा क्रम, विसाव्याचे ठिकाण, नाश्ता, दुपारची विश्रांती, भोजन ते ठिकाण, मुक्कामाची जागा, तळावरील राहुट्या, ऐन जेवणाच्या वेळी आलेला पाऊस, राहुटीत शिरलेले पाणी या सर्व आठवणी डोळ्यासमोर तरळत असतात. सोमवारी दिवे घाटातील नाथांचे अभंग तर उशिरापर्यंत माउलीचे धाकटे बंधू सोपानकाका यांच्या गावी सासवडला आल्यानंतर बुधवारी काकांच्या पालखीचे प्रस्थान करून वारकरी बुधवारी जेजुरी खंडोबाच्या नगरीकडे चालतात. या सर्व आठवणी आता जागेवरच बसूनच वारीत सहभागी असल्याची मानसवारी वारकरी करतो आहे.

060721\img-20210706-wa0038.jpg

वारकरी शरिराने घरी मनाने चालतोय वारीत

Web Title: The atmosphere changed, hopes were raised