आष्टी तहसील टेम्पो चोरी प्रकरण: ३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; वाळू माफिया सापडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:45 IST2026-01-24T15:45:06+5:302026-01-24T15:45:54+5:30

तहसीलदार रजेवर गेल्याची संधी साधून माफियांनी धाडस करत थेट कार्यालयातून टेम्पो पळवला

Ashti Tehsil sand tempo theft case: Case registered against 3 unknown persons; Will the police find the sand mafia? | आष्टी तहसील टेम्पो चोरी प्रकरण: ३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; वाळू माफिया सापडणार का?

आष्टी तहसील टेम्पो चोरी प्रकरण: ३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; वाळू माफिया सापडणार का?

कडा (प्रतिनिधी): आष्टी तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करून लावलेला वाळूचा टेम्पो पळवून नेल्याच्या खळबळजनक प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. वाहिरा सज्जाचे कोतवाल शरद मेटे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या चोरीमागचा खरा सूत्रधार आणि तो 'वाळू माफिया' कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

१३ जानेवारी रोजी तहसीलदार वैशाली पाटील यांनी चिखली येथे अवैध वाळू वाहतूक करणारा एक छोटा टेम्पो पकडला होता. या टेम्पोमध्ये ३ ब्रास वाळू होती. हा टेम्पो तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस सुरक्षित लावण्यात आला होता. मात्र, २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जेव्हा तहसीलदार रजेवर होत्या, तेव्हा ३ अज्ञातांनी भिंतीवरून आत प्रवेश करून हा टेम्पो पळवून नेला. यात २ लाख रुपयांचा टेम्पो आणि २२ हजार ७४ रुपयांची वाळू असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाला आहे.

तहसीलदार रजेवर गेल्याची संधी साधली
जप्त केलेले वाहन सरकारी आवारातून पळवले जाणे, ही प्रशासनासाठी अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी संबंधित गुंडांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर, तो टेम्पो कोणाच्या मालकीचा होता आणि तो पळवणारे चालक कोण होते, याचा शोध घेणे आष्टी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तहसीलदार रजेवर गेल्याची संधी साधून ज्या पद्धतीने हे धाडस करण्यात आले, त्यावरून हे काम एखाद्या मोठ्या वाळू माफियाचेच असल्याचे बोलले जात आहे. आता पोलीस या माफियांच्या मुसक्या आवळणार की प्रकरण केवळ कागदावरच राहणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : आष्टी तहसील: टेम्पो चोरी मामला दर्ज; क्या रेत माफिया पकड़ा जाएगा?

Web Summary : आष्टी तहसील से अवैध रेत परिवहन के लिए जब्त एक टेम्पो चोरी हो गया। पुलिस ने तीन अज्ञात व्यक्तियों के खिलाफ मामला दर्ज किया। घटना रेत माफिया की संलिप्तता और पुलिस कार्रवाई के बारे में सवाल उठाती है।

Web Title : Ashti Tehsil: Tempo Theft Case Filed; Will Sand Mafia Be Caught?

Web Summary : A tempo seized for illegal sand transport was stolen from Ashti Tehsil. Police filed a case against three unknown individuals. The incident raises questions about the involvement of a sand mafia and police action.