संतापजनक ! भावकीतील मुलानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडिता पाच महिन्यांची गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 18:13 IST2021-10-04T18:11:33+5:302021-10-04T18:13:12+5:30

१६ वर्षीय मुलीस गावातील भावकीतील एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

Annoying! A minor girl was abused by her brother; The victim is five months pregnant | संतापजनक ! भावकीतील मुलानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडिता पाच महिन्यांची गर्भवती

संतापजनक ! भावकीतील मुलानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडिता पाच महिन्यांची गर्भवती

केज ( बीड ) : भावकीतील एकाने १६ वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पिडीत मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. 

'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे', असे म्हणत १६ वर्षीय मुलीस गावातील भावकीतील एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला शेतात नेत अत्याचार केला. आमिष देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर ही घटना उघडकीस आली.  या प्रकरणी अल्पवयीन मुलीने केज पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली. यावरून भावकितील नराधमाच्या विरुद्ध  गु. र. न. ४८२/२०२१  भा. दं. वि. ३७६(२), ३७६ (एन), ३७६ (एफ) यासह अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पोक्सो कलम ४ व ६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास प्र. पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी आणि रुक्मिणी पाचपिंडे करत आहेत. 

Web Title: Annoying! A minor girl was abused by her brother; The victim is five months pregnant