मुंबई/बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दांत आपले दु:ख व्यक्त केले आहे. "दादा, अशी एक्झिट घ्यायची नव्हती, तुम्ही जीवाला चटका लावून गेलात," अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
'हसवणाऱ्या नेत्याने आज रडवलं' अजित पवारांच्या स्वभावातील पैलू उलगडताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "दादांचा राजकीय आणि अकॅडमिक सेन्स जबरदस्त होता. त्यांच्या भाषणातील विनोदबुद्धीने त्यांनी अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं, पण आज त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. त्यांच्यासोबत केलेला प्रवास, मारलेल्या गप्पा आणि चर्चा सदैव स्मरणात राहतील."
कुशल प्रशासकाची उणीव भासणार पंकजा मुंडे यांनी अजितदादांचा उल्लेख 'डायनामिक नेता' असा केला. राजकारणात शब्दाला जागणारा आणि प्रशासनावर दरारा असलेला असा अनुभवी नेता आता पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत त्यांनी दादांच्या कार्याचा गौरव केला. "जनतेत रमणारा आणि जनतेसाठी झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाहीये," असेही त्या म्हणाल्या. शेवटी, "हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वर पवार कुटुंबियांना देवो," अशी प्रार्थना करत त्यांनी संपूर्ण मुंडे परिवारातर्फे अजितदादांना आदरांजली वाहिली.
Web Summary : Pankaja Munde mourns Ajit Pawar's sudden demise, expressing deep sorrow. She remembers his wit, political acumen, and dedication, highlighting the void left by the dynamic leader. The Munde family offers heartfelt condolences.
Web Summary : पंकजा मुंडे ने अजित पवार के आकस्मिक निधन पर गहरा शोक व्यक्त किया। उन्होंने उनकी हास्य, राजनीतिक कौशल और समर्पण को याद किया, और कहा कि इस गतिशील नेता के जाने से एक खालीपन आ गया है। मुंडे परिवार ने हार्दिक संवेदनाएं व्यक्त कीं।