शेतकामाला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:22+5:302021-07-18T04:24:22+5:30
जास्वंदीच्या झाडाला लालबुंद फुलांचा बहर शिरूर कासार : पाऊस पडला आणि सर्वत्र चैतन्य पसरले. शेतशिवारासह परस बागेत असणाऱ्या फुल ...

शेतकामाला आला वेग
जास्वंदीच्या झाडाला लालबुंद फुलांचा बहर
शिरूर कासार : पाऊस पडला आणि सर्वत्र चैतन्य पसरले. शेतशिवारासह परस बागेत असणाऱ्या फुल झाडांना देखील वेगवेगळे रंग चढले आहेत. जास्वंदीच्या झाडाला लालबुंद फुलांचा बहर आल्याचे जागोजागी दिसून येत आहे .
विकेंडचा लाॅकडाऊन, नगरपंचायतचा फेरफटका
शिरूर कासार : शनिवार रविवार दोन दिवस संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने नियमांची अंमलबजावणी होते किंवा नाही यासाठी नगरपंचायत कर्मचारी शहरात फेरफटका मारत असल्याचे शनिवारी दिसून आले. कोरोना नियमावलीचे व दिलेल्या वेळेचे तंतोतंत पालन करा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन देखील घंटागाडीच्या माध्यमातून केले जात आहे. वेळेचं बंधन न पाळल्यास दंडात्मक कारवाई अटळ असल्याचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले .
सेवेसाठी रुग्णवाहिका दाखल
गॅस एजन्सी राम कांबळे यांचा उपक्रम
शिरूर कासार : कोरोना काळात रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहाेचण्यासाठी वाहनधारकांकडून होणारी अडवणूक व आडमाप भाडे घेत असल्याचे लक्षात आले. रुग्णांना गरजेच्या वेळी अडवणूक व पिळवणूक होऊ नये, या उदात्त हेतूने आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष राम कांबळे यांनी आदर्श पत्रकार संघाच्या संकल्पनेतून नवी रुग्णवाहिका आणून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगितेचे पाऊल टाकले आहे. ही गाडी अगदी माफक भाडे मूल्य घेऊन गरजूंना दिली जाणार असल्याचे सांगितले. या गाडीची यथावत पूजा शुक्रवारी सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते केली यावेळी सर्व पत्रकार तसेच मा. उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, बबनराव चौधरी, डॉ. गणेश देशपांडे, अंगद पानसंबळ आदींची उपस्थिती होती .
170721\1333-img-20210717-wa0030.jpg
दंडात्मक कारवाई करतांना नगरपंचायत पथक