शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये ४० वीजचोरांवर कारवाई, २७ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

केज : तालुक्यात वीजचोरी वाढल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली. वीजगळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने केज विद्युत वितरण कंपनीने वीजचोरी ...

केज : तालुक्यात वीजचोरी वाढल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात

वाढ झाली. वीजगळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने केज विद्युत वितरण

कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम चालू केली आहे. वीजचोरी

करणाऱ्या ४० जणांविरुद्ध कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २७ जणांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे

दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी

लोकमतला दिली.

केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील

सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ

झाल्याने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यास

सुरवात करत केज तालुक्यातील नायगाव सुकळी येथे सहा, आवंढ शिरपुरा येथे दहा, भालगाव येथे चार, बावचीत एकावर तर कवडगाव येथे एका वीजचोरी

करणाऱ्यांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर केज शहरातील सात विद्युतग्राहकांच्या

मीटरची तपासणी करण्यात आली आहे. या सात ग्राहकांनी विद्युत मीटरमधून वीज

चोरी केल्याचे आढळून आल्याने त्यांना दंडाची आकारणी करण्यात आली आहे. दंडाचा भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई

पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई

विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली केज

विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर, सहायक अभियंता

अमोल मुंडे, सचिन चव्हाण, रोशन रामेकर, रामराव नाकाडे व केज उपविभागातील

वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोहीम सुरूच राहणार

तालुक्यात ४० लोकांवर कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर २७ जणाविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यात या पुढेही वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मोहीम चालूच राहणार असल्याचे केज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला सांगितले.