शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

धारूर घाटात पुन्हा अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

धारूर : कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे आरणवाडीजवळील घाटात ...

धारूर : कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे आरणवाडीजवळील घाटात घडली. तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून, प्रवाशांत मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

किल्ले धारूर घाटामध्ये राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर शुक्रवारी सकाळी सहाच्यासुमारास कार व दुचाकीचा अपघात झाला. कार (क्र. एमएच २० एफ. पी. ४१३२) ही औरंगाबाद येथून लातूरकडे जात होती. तेलगावकडे जाणाऱ्या दुचाकीला कार धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. मृताचे नाव शैलेश पवार (रा. औरंगाबाद) असल्याचे कळते. या अपघातातील जखमीला किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एक वर्षाच्या रुद्र या बालकासह प्रवीण कातळे, महारुद्र कातळे या दोघांचा समावेश होता. यातील प्रवीण यास गंभीर मार लागल्याने अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये हलवण्यात आले आहे.

वाहतूक, घाटातील वळणे अपघाताचे कारण

गुरुवारी तेलगाव येथे बीड-परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर अंबेवडगाव येथे ४ मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होऊन एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहे. येथील घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने घाटात तासन‌‌तास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसत आहे.

===Photopath===

120321\anil mhajan_img-20210312-wa0039_14.jpg

===Caption===

धारूर घाटात शुक्रवारी झालेल्या कार- दुचाकी अपघातात एक जण ठार झाल्याची घटना  घडली.