तक्रार का दिलीस म्हणून शिवीगाळ; गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:30+5:302021-07-25T04:28:30+5:30

धारूर तालुक्यातील मोहखेड येथील एका महिलेचे २०१४ साली माजलगाव तालुक्यातील समर्थनगर चिंचगव्हाण येथील संतोष सरवदे या तरुणाशी लग्न झाले ...

Abusive as to why the complaint was filed; Crime record | तक्रार का दिलीस म्हणून शिवीगाळ; गुन्हा नोंद

तक्रार का दिलीस म्हणून शिवीगाळ; गुन्हा नोंद

धारूर तालुक्यातील मोहखेड येथील एका महिलेचे २०१४ साली माजलगाव तालुक्यातील समर्थनगर चिंचगव्हाण येथील संतोष सरवदे या तरुणाशी लग्न झाले होते. लग्नापासून पैशाची मागणी करत सदर महिलेचा सतत छळ करण्यात आला होता. व्यवसायासाठी माहेरच्या नातेवाइकांकडून पैसे आण म्हणून महिलेस हाणामारी करत शिवीगाळ करण्यात येत होती. माहेरच्या लोकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तिला घराबाहेर हाकलून देण्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात पीडित महिलेने महिला तक्रार निवारण केंद्र बीड येथे सरवदे कुटुंबाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत संतोष मधुकर सरवदे, मधुकर देवराव सरवदे, सीताबाई मधुकर सरवदे‌ सर्व रा. समर्थ नगर, चिंचगव्हाण, तालुका माजलगाव तसेच प्रणिता गणेश बोबडे व गणेश बोबडे, रा. गंगाखेड यांची नावे दिली होती. याचा रा. मनात धरून वरील सर्वांनी मोहखेड येथील महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने सिरसाळा पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणात सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Abusive as to why the complaint was filed; Crime record