घरी परणाऱ्या तरुणास अज्ञात वाहनाने उडवले; उपचारासाठी नेत असताना झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:14 IST2022-06-02T12:14:15+5:302022-06-02T12:14:46+5:30

धारूर ते धुनकवड पाटी हा मार्ग अरूंद असल्याने नियमित अपघात होतात.

A young man returning home was blown up by an unknown vehicle; Died while being taken for treatment | घरी परणाऱ्या तरुणास अज्ञात वाहनाने उडवले; उपचारासाठी नेत असताना झाला मृत्यू

घरी परणाऱ्या तरुणास अज्ञात वाहनाने उडवले; उपचारासाठी नेत असताना झाला मृत्यू

किल्लेधारूर  (बीड ) : अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री चोरंबा रोडवर घडली. दिंगबर शिराळे असे मृत तरुणाचे नाव आहे. शिराळे हे पत्रकार होते. त्यांच्या अपघातीमृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

दिवसभराचे काम संपवून दिंगबर शिराळे हे बुधवारी सायंकाळी थेटेगव्हाण येथून चोरंबा या मुळगावी बाईकवरून परतत होते. दरम्यान, त्यांच्या बाईकला (क्र एम एच 44 वाय 3376) समोरून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. यात शिराळे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात त्यांना रवाना करण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक महिन्याचा मुलगा आहे. 

दरम्यान, धारूर ते धुनकवड पाटी हा मार्ग अरूंद असल्याने नियमित अपघात होतात. तरुण पत्रकार शिराळे हे देखील याचाच बळी ठरले. पोलिसांनी धडक देऊन फरार झालेल्या वाहनांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. 

Web Title: A young man returning home was blown up by an unknown vehicle; Died while being taken for treatment