धक्कादायक! परळीत रेल्वेरुळावर संपवले पोलिस निरीक्षकाने जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:18 IST2024-03-09T11:17:19+5:302024-03-09T11:18:03+5:30

मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत

A police inspector ended his life on the railway tracks in Parli | धक्कादायक! परळीत रेल्वेरुळावर संपवले पोलिस निरीक्षकाने जीवन

धक्कादायक! परळीत रेल्वेरुळावर संपवले पोलिस निरीक्षकाने जीवन

परळी: काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूला खालील रेल्वेरुळावर आढळून आला. शुक्रवारी रात्रीनंतर पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 

परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये  रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची माहिती कळविली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उड्डाणपूला जवळील रेल्वे पटरीवर एका जणाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला.  मयत व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असे असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. 

बीड येथून पुण्यात झाली होती बदली 
दरम्यान, मृत धुमाळ पोलिस खात्यातील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बीड येथून पुणे येथे सीआयडी पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून कौटुंबिक कारणाने त्यांनी जीवन संवल्याची माहिती आहे.

Web Title: A police inspector ended his life on the railway tracks in Parli