धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:56 IST2022-04-22T10:48:33+5:302022-04-22T10:56:04+5:30
ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले
धारूर ( बीड) : ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने एका 5 वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना धारूर आगारासमोर आज सकाळी साडेआठ वाजता घडली. शिवराज लक्ष्मण सुरवसे असे मृत बालकाचे नाव आहे. या अरुंद रस्त्यावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
आज सकाळी 5 वर्षीय शिवराज आपल्या आजीसोबत शेतातून दुध घेऊन शहरातील संभाजीनगर भागात येत होता. आगारासमोर अचानक एका भरधाव ट्रॅक्टरने (क्र एम एच 44 डी 1908) शिवराजला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त शहरात पसरल्याने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.