विद्युतपंप लावताना पाय घसरला, १६ वर्षीय शेतकरीपुत्राचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 19:26 IST2023-01-30T19:26:33+5:302023-01-30T19:26:58+5:30

विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढताना अडचणी आल्या.

A 16-year-old farmer's son died after falling into a well when his foot slipped while installing an electric pump | विद्युतपंप लावताना पाय घसरला, १६ वर्षीय शेतकरीपुत्राचा विहिरीत पडून मृत्यू

विद्युतपंप लावताना पाय घसरला, १६ वर्षीय शेतकरीपुत्राचा विहिरीत पडून मृत्यू

- नितीन कांबळे
कडा (बीड):
विद्युत पंप लावत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने एका १६ वर्षीय शेतकरीपुत्राचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. संदिप बारीकराव खाडे असे मृत मुलाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग भोजीबा खाडे हे पुतण्या संदिपला सोबत घेऊन सकाळी शेतात गेले होते. विहीरीत विद्युत पंप सोडण्याचे काम करत असताना अचानक संदीपचा पाय घसरला. विहीरीला कठडे नसल्याने संदीप थेट विहिरीत पडला. चुलत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. मदत मिळेपर्यंत पोहता येत नसल्याने संदीपचा मृत्यू झाला. 

विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढताना अडचणी आल्या. वेगवेगळे प्रयत्न करून देखील यश येत नव्हते. तीन तासानंतर अखेर गळाच्या माध्यमातून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले. माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी  देशमाने, अंमलदार लुईस पवार, शिवदास केदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
 

Web Title: A 16-year-old farmer's son died after falling into a well when his foot slipped while installing an electric pump