शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दामदुपटीचे आमिष दाखवून ९० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

बीड : ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना दामदुप्पट आणि प्लॉटची आमिषे दाखवून बीडमध्ये विविध ग्राहकांना ९० लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर ...

बीड : ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना दामदुप्पट आणि प्लॉटची आमिषे दाखवून बीडमध्ये विविध ग्राहकांना ९० लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ‘ मेरीट लॅन्ड मार्क्स’ कंपनीच्या चेअरमन आणि संचालकासह चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जालना रोडवरील लक्ष्मी संकुलातील ‘मेरीट लॅन्ड मार्क्स लि.पुणे’ यांच्या शाखेचे कार्यालय आहे. या शाखेत २०१४ ते २०१७ या कालावधीत कंपनीने ठेवीदारांना प्लॉट घेण्यासाठी कमीत कमी १ हजार रुपयांच्या पुढे मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक हप्ते भरल्यास पाच वर्षांनंतर त्याच्या दुप्पट पैसे किंवा पैसे नको असल्याचा प्लॉट तुमच्या नावाने करून दिला जाईल असे आमिष दाखविले. या स्कीमच्या आमिषाला बीडमधील अनेक जण बळी पडले असून, गुंतवणूकदारांकडून ८९ लाख ९४ हजार ४०० रुपयांच्या ठेवी जमा करून घेतल्या आहेत. मात्र, कंपनीने मुदत संपूनही गुंतवणूकदारांना पैसे अथवा प्लॉट न दिल्याने बापूसाहेब बापूराव गळगटे (रा. हरिनारायण आष्टा, ता. आष्टी) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी ‘मेरीट लॅन्ड मार्क्सचे’ संचालक महेश मुंगशे, सुरेश जाधव, किरण आटपालकर, महादेव साळुंके यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रवी सानप हे करीत आहेत.

....

आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार गुन्हा

दामदुप्पट किंवा प्लॉटचे आमिष दाखवून जिल्ह्यातील नागरिकांची ९० लाखाला फसवणूक केली आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीदेखील या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे. राज्यातील किती जिल्ह्यात अशा प्रकारे कंपनीकडून फसवणूक करण्यात आली याचा तपासदेखील होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

...

आमिषाला बळी पडू नये

नागरिकांची यापूर्वीदेखील दामदुप्पट व इतर आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरीदेखील सर्वसामान्य नागरिक आमिषाला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्व खात्री केल्याशिवाय पैसे गुंतवणूक करू नये. त्या कंपनीची चोहोबाजूने माहिती घेत त्यामध्ये गुंतवणूक करावी व फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.