भरधाव ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:31 AM2021-03-08T04:31:45+5:302021-03-08T04:31:45+5:30

बीड : सरकी वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ७ ...

5 killed in truck collision | भरधाव ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

Next

बीड : सरकी वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी सातच्यासुमारास तालुक्यातील बीड-परळी रोडवर मोची-पिंपळगाव परिसरात घडली. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला, नंतर बीड ते वडवणी रोडवरील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी व नंतर मालवाहू रिक्षाला धडक दिली. त्यानंतर ट्रक पलटी झाला. चालक फरार झाल्याची माहिती आहे. यात दहाजण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सरकी वाहून नेणारा भरधाव ट्रक (क्र.एमएच ०९ सीव्ही ९६४४) ने वडवणीकडून बीडकडे येणाऱ्या एका प्रवासी रिक्षाला (क्र. एमएच २३-५६९४) मोची-पिंपळगाव, पांगरबावडीनजीक जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये रिक्षातील तबसूम पठाण, रिहाण पठाण (वय १३), शारो सत्तार पठाण, तमन्ना अबजान पठाण (८) व मदिना पठाण (सर्व रा. शाहूनगर, बीड ) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये रिक्षाचालक सिद्धार्थ शिंदे व त्याचा भाऊ अविनाश शिंदे (दोघे रा. ढेकणमोहा, ता. बीड) तसेच प्रवासी जाईबाई कदम (रा. काळवाडी), मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे (रा. देवळा), गोरख खरचाडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला व तालुक्यातील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी (क्र. एमएच २३ व्ही ३२१६) ला धडक दिली. यात चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर पुढे जाऊन लाकडं वाहून नेणाऱ्या एका मालवाहू रिक्षाला (एमएच २० एजी १२६३) जोराची धडक दिली. या अपघातात तीनजण जखमी झाल्याची माहिती आहे. पुढे काही अंतरावर जाऊन ट्रकही पलटी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका व पोलीस प्रशासनाने त्याठिकाणी धाव घेतली. दुचाकी व लाकंे वाहून नेणाऱ्या रिक्षामधील जखमींची नावे समजू शकली नसून, दोन जखमींना औरंगाबादला उपचारासाठी पाठविले आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे.

अपघातातील रिक्षा, ट्रक आणि मोटारसायकल.

===Photopath===

070321\072_bed_25_07032021_14.jpg~070321\072_bed_24_07032021_14.jpeg

===Caption===

अपघातातील रिक्षा ~अपघातातील दुचाकी

Web Title: 5 killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.