3% water reservoir in Majalgaon Dam | माजलगाव धरणात ५३ टक्के पाणीसाठा
माजलगाव धरणात ५३ टक्के पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : मागील पंधरवड्यात झालेला दमदार पाऊसधरण परिसरात गुरु वारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने शनिवारी रात्री ८ वाजता हे धरण ५३ टक्के भरले. आता धरण भरायला केवळ ७ फुट पाण्याची आवश्यकता आहे.
मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५४ मीटर पाणी पातळी होती . गुरु वारी सांयकाळी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शुक्र वार व शनिवारी धरणात पाण्याची आवक जास्त राहिल्यामुळे पाणी पातळी चांगलीच वाढली. शुक्रवारी पाणी पातळी ४२९.०४ मीटर एवढी झाली होती ती शनिवारी ४२९.६४ मीटर झाली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर पाण्याची आवश्यकता असते.आता हे धरण भरण्यासाठी २.१६ मीटर म्हणजे ७ फूट पाण्याची आवश्यकता आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असला तरी १५ दिवसांत अतिशय जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू पहावयास मिळत आहे.


Web Title: 3% water reservoir in Majalgaon Dam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.