शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST

गेवराई : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेवराई तालुक्यात २०० खाटांचे कोविड ...

गेवराई : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेवराई तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित होणार असून, याठिकाणी ऑक्सिजनची सुविधासुद्धा उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते. रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही दूरध्वनीवरुन चर्चा केली.

आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर, एक्स-रे मशीनसह मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक यंत्रसामुग्री पंडित यांच्यातर्फे भेट देण्यात आली. दिनांक १० एप्रिल रोजी गेवराई येथे वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला असून, शिवाजीनगर (गढी) येथील जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीमध्ये हे सेंटर सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे.

गेवराई येथून मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण उपचारासाठी बीड येथे जातात. यावेळी अनेकांना ऑक्सिजन बेडसह इतर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी गढी येथील जयभवानी शिक्षण संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

अमरसिंह पंडित यांच्या सहकार्याने गेवराई तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्यामुळे आता कोविड रुग्णांना उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांनी या जागेची पाहणी करुन आरोग्य सुविधा उभारण्याबाबत मार्गदर्शन केले. गेवराई तालुक्यातील कोविड रुग्णांना भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत या दृष्टीकोनातून पंडित यांनी हे पाऊल उचलले आहे. या कोविड सेंटरचा मोठा फायदा तालुक्यातील रुग्णांना होणार आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवरील भार यामुळे कमी होणार आहे.

===Photopath===

100421\img-20210410-wa0354_14.jpg

===Caption===

आरोग्यविषयक आढावा बैठकीत माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यासह  तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते.