नवे १५५ रुग्ण; १५१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:27+5:302021-06-21T04:22:27+5:30

जिल्ह्यात शनिवारी ४२२४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रविवारी दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले. यात १५५ जण बाधित ...

155 new patients; 151 coronal free | नवे १५५ रुग्ण; १५१ कोरोनामुक्त

नवे १५५ रुग्ण; १५१ कोरोनामुक्त

जिल्ह्यात शनिवारी ४२२४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रविवारी दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले. यात १५५ जण बाधित आढळले, तर ४०६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ८, आष्टी २५, बीड ३४, धारूर ६, गेवराई १५, केज २३, माजलगाव १५, परळी ४, पाटोदा ६, शिरूर ९ व वडवणी तालुक्यातील १० रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ५२१ इतका झाला असून यापैकी ८६ हजार ७७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, जुन्या ४ मृत्यूंसह २४ तासांतील ५ अशा एकूण ९ मृत्यूंची नोंद झाली. यात गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील ७५ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, सदरबाजार अंबाजोगाई येथील ७० वर्षीय पुरुष, शेकापूर (ता. आष्टी) येथील ५० वर्षीय पुरुष व सुप्पा (ता. पाटोदा) येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा २ हजार ४५३ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: 155 new patients; 151 coronal free