शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

तुम्हीही आंघोळ करताना 'लोफह'चा वापर करताय?; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 13:06 IST

आपण दररोज आंघोळ करतो. कधीकधी घाईघाईत आपण फक्त पाणी अंगावर ओतून बाहेर येतो, तर कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढचं नाही तर कधीकधी तासन्तास आपण आंघोळच करत बसतो.

(Image Credit : Women's Health)

आपण दररोज आंघोळ करतो. कधीकधी घाईघाईत आपण फक्त पाणी अंगावर ओतून बाहेर येतो, तर कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढचं नाही तर कधीकधी तासन्तास आपण आंघोळच करत बसतो. अनेकदा सुट्टीच्या दिवशी निवांत वेळ मिळतो आणि त्यादिवशी शरीराची व्यवस्थित स्वच्छता राखण्यासाठी आपण वेळ घेऊन आंघोळ करतो. अशातच आंघोळीदरम्यान आपण काही वस्तूंचा वापर करतो. तुमच्याही बाथरूममध्ये काही खास गोष्टी असतीलच. यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो, तो लोफहचा. तुम्हीही लोफहचा वापर करण्याचे शौकीन असाल तर कदाचित पुढिल काही गोष्टी वाचून तुम्ही त्याचा वापर करणं सोडून देऊ शकता. 

टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या अनेक जाहिरातींमध्ये अनेक सेलिब्रिटी किंवा मॉडल्स  लोफह घेऊन बॉडिवॉश लावताना दिसतात. लोफह अंगावर घाम स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. परंतु याचा वापर करणं अत्यंत घातक ठरू शकतं. जाणून घेऊया कशाप्रकारे लोफह तुमच्या सुंदर त्वचेसाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतो. 

कशासाठी करण्यात येतो लोफहचा वापर? 

लोफह कोणतंही जेल किंवा बॉडिवॉश लिक्विडला संपूर्ण शरीरावर अगदी सहज पसरवण्यासाठी मदत करतो. याचा वापर केल्याने साबणाचा किंवा बॉडिवॉशचा उत्तम फेस होतो. लोफह रखरखीत असतो. त्यामुळे बॉडीवर स्क्रब करण्यासाठी त्याचा परिणाम होतो. यामुळे शरीरावरील घाण निघून जाते. लोफहच्या वापरामुळे शरीराची उत्तम स्वच्छता करणं शक्य होतं. याव्यतिरिक्त शरीरावर पसरणाऱ्या बॅक्टेरियापासून लोफह सुटका करण्याचं काम करतो. 

लोफहपासून दूर राहणं का आहे आवश्यक? 

त्वचा विशेषज्ञ आणि एक्सपर्ट्स यांनी सांगितल्यानुसार, लोफहचा वापर करणं त्वचेसोबतच शरीरासाठीही हानिकारक आहे. यामुळे तुमच्या त्वचेला फायद्यांपेक्षाही जास्त नुकसान होत आहेत. 

लोफहच्या वापरामुळे त्वचेला का होतं नुकसान? 

लोफह वर जेल किंवा लिक्विड पसरवल्यानंतर आणि त्याआधीही लोफह ओला करणं गरजेचं असतं. एकदा ओला केल्यानंतर लोफह बराच वेळ ओला राहतो. ज्यामुळे यावर बॅक्टेरिया, किटाणु आणि यीस्ट तयार होतात. 

त्वचेला कशाप्रकारे होतं नुकसान? 

लोफहमध्ये तयार झालेले बॅक्टेरिया, किटाणु आणि यीस्ट आपल्या शरीरामध्ये साबणाच्या फेसामार्फत पसरत असतात. तुम्ही लोफहचा वापर शरीराच्या प्रत्येक अवयवावर करता. जिथून बॅक्टेरिया कधी कधी पाण्याचा वापर करूनही दूर होत नाहीत. तर ते आणखी वाढतात. यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका आणखी वाढतो. इन्फेक्शन व्यतिरिक्त आपल्या त्वचेवर पिंपल्सही होऊ शकतात. लोफहचा वापर दररोज करा, किंवा कधी कधी, कही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही याचा सुरक्षित वापर करू शकता. समस्या लोफहमध्ये ओलावा असल्यामुळे तयार होतात. अशातच लोफहचा वापर केल्यानंतर तुम्ही तो पूर्णपणे व्यवस्थित कोरडा करा. पंख्याचा उपयोग करून किंवा उन्हामध्ये ठेवून. उन्हामुळे लोफहमध्ये तयार होणारे बॅक्टेरिया संपून जातात. त्यानंतर लोफहचा उपयोग सुरक्षित असतो. याव्यतिरिक्त तुम्ही काही ठराविक दिवसांनी नवीन लोफह खरेदी करून त्याचा वापर करू शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स