शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

शरीराच्या 'या' भागांवर सगळ्यात आधी दिसतात वयवाढीच्या खुणा; त्वचेची 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 5:28 PM

आपल्या त्वचेवरील वयवाढीच्या खुणा लपवण्याकरीता लोक महागड्या क्रिम्सचा वापर करतात. जसंजसं वय वाढतं तसंतसं त्वचेवर खुणा दिसायला सुरूवात होते.

कोणालाही वयाआधीच म्हातारं दिसावसं वाटतं नसतं. आपण आपल्या वयापेक्षा काही वर्षांनी लहान दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपल्या त्वचेवरील वयवाढीच्या खुणा लपवण्याकरीता लोक महागड्या क्रिम्सचा वापर करतात. जसंजसं वय वाढतं तसंतसं त्वचेवर खुणा दिसायला सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागावर सुरकुत्या आणि वयवाढीच्या खुणा सगळ्यात आधी दिसतात याबाबत सांगणार आहोत.त्वचेवर २० वर्षानंतर कोलोजनचं उत्पादन कमी  प्रमाणात होतं. त्यामुळे त्वचेतील मुलायमपणा कमी होतो. जे लोक जास्तवेळ उन्हात काम करतात, आहार व्यवस्थित घेत नाहीत. ज्यांच्या शरीरात हार्मोनल बदल जलदगतीनं होतात त्यांच्या शरीरावर सुरकुत्या खूप लवकर येतात. 

कपाळ

कपाळावर सुरकुत्या सगळ्यात आधी यायला सुरूवात होते. रेटिनॉलयुक्त उत्पादन सुरकुत्यांना कमी करून कोलोजनचं प्रमाण वाढतात. यामुळे त्वचा चमकदार आणि सॉफ्ट होते. त्वचेतील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. त्वचेला नेहमी तरूण ठेवण्यासाठी रात्री फेशियल नाइट क्रिम लावून झोपा. मादक पदार्थांचे सेवन करून नका, स्मोकिंग करणं टाळा, जास्तीत जास्त पाणी प्या. हिरव्या भाज्यांचे सेवन करा. 

पापण्या

वाढत्या वयात पापण्यांवर सुरकुत्या यायला सुरूवात होते. त्यामुळे मासपेशी कमजोर होतात आणि पापण्यांची त्वचा लोमकळू लागते.  डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेला चांगले ठेवण्यासाठी टी बॅग्सचा वापर करा. त्यामुळे डोळ्यांचा ड्रायनेस कमी होण्यास मदत होईल. चांगल्या क्वालिटीचे मॉईश्चराईजिंग क्रिम किंवा आयक्रिमचा वापर करा. 

मान

मानेची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेच्या तुलनेत खूप पातळ असते. मानेसह शरीराच्या इतर भागांवर सुरकुत्या यायला सुरूवात होते. तुमचं वय ३० वर्षांच्या आसपास असेल तर त्वचेवर घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही सौंदर्याची काळजी  घेऊ शकता. बटाट्याचा रस,  बेसन आणि दुधाचा फेसफॅक लावून त्वचेला चांगले ठेवता येईल. 

हात

हात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कात येत असतो. हाताला २० वर्षानंतर सुरकुत्या दिसायला सुरूवात होते. सुर्याच्या युव्ही रेजमुळे त्वचेला नुकसान पोहोचतं म्हणून कुठेही बाहेर जाताना हाताना सनस्क्रिन किंवा  मॉईश्चराईजर लावून जा. तुमच्या हातांमध्ये जितका सॉफ्टनेस असेल तितकेच तुमचे हात चांगले दिसतील. 

ओठ

वाढत्या वयात ओठांवरही वय वाढण्याच्या खुणा दिसून  येतात. ओठांवर बारिक बारिक रेषा येतात. या रेषांमुळे त्वचा काळपट होते. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा येतो. त्वचेवर तेलाचं उत्पादन कमी होतं. ओठांना दीर्घकाळ चांगलं ठेवायचं असेल तर रात्री झोपण्याआधी ओठांना तूप लावून झोपा.  ज्यामुळे तुमचे ओठ नेहमी सॉफ्ट राहतील. 

हे पण वाचा-

चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स