तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:16 PM2020-08-30T12:16:26+5:302020-08-30T12:20:58+5:30

सकाळी रिकाम्यापोटी दूध पिणं कितपत फायदेशीर ठरतं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips Marathi : Why we should not drink milk on empty stomach | तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

googlenewsNext

सकाळी सकाळी दूध प्यायला अनेकांना आवडत नाही. दुधात  शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक गुणधर्म असून प्रत्येकानं दूधाचं सेवन करायला हवं.  पण सकाळी रिकाम्यापोटी दूध पिणं कितपत फायदेशीर ठरतं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  सकाळी दूध प्यायला आवडत नाही, सकाळी दूध प्यायल्यानं मूड ऑफ  होतो अशाही अनेकांच्या समस्या असतात. 

आयुर्वेदात दुधाच्या सेवनाशी जोडलेल्या अनेक बाबींबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आयुर्वेदानुसार तुम्हाला कफ किंवा पित्ताचा त्रास असेल तर कधीही रिकाम्यापोटी दूध पिऊ नका. कारण त्यामुळे जास्त कफ आणि खोकल्याची समस्या जास्त उद्भवू शकते. त्यासाठी  सकाळी  उठल्या उठल्या दूधाचं सेवन करणं टाळायला हवं. नाष्ता केल्यानंतर दूध घेतल्यास हरकत नाही. 

दिवसभर झोप येणं

दूध पचण्यासाठी खूप वेळ लागतो. रिकाम्या पोटी दूध प्यायल्यानं  अनेकदा आळस येतो. झोप जास्त येते. म्हणून अनेकजण सकाळी दूध पिणं टाळतात. याशिवाय रिकाम्यापोटी दूध प्यायल्यानं शरीर खूप जड होतं. अनेकदा पचनक्रियेवर परिणाम होतो. गॅस, एसिडिटीची समस्या उद्भवते. म्हणून सकाळी  रिकाम्यापोटी दूध पिणं टाळायला हवं.

ज्यांना दूध पिण्याचा त्रास असतो, पचायला त्रास होत असेल तर अशांनी डॉकटरांच्या सल्ल्यानेच दूध प्यावे. दूधात सुंठ मिसळून प्यावे. यामुळे त्रास कमी होईल. रात्रीच्या वेळेस दूध प्यायचे असेल तर जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ याचं गणित सांभाळा. रात्रीच्या जेवणानंतर 2 तासांनी दूध प्या.

सकाळच्यावेळी दूध पिण्याचे फायदे :

जर तुम्हाला दिवसाची उत्तम सुरुवात करण्याची गरज असेल तर सकाळी एक ग्लास दूध पिणं फायदेशीर ठरतं. दूधामध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्व असतात.  

सकाळी लवकर दूध पिण्याचे तोटे :

जर तुम्ही सकाळी दूध पित असाल, तर हे तुमच्यासाठी फार हेव्ही मील असू शकतं. सकाळी लवकर हेव्ही मील घेतल्याने पचनक्रिया बिघडू शकते. ज्यामुळे पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. जास्तीत जास्त डॉक्टर्स आणि डाएटिशन्सनुसार, सकाळच्या वेळी आपल्या पचनक्रियेवर जास्त भार टाकणं चांगलं नाही. त्यामुळे सकाळी सकाळी दूध पिणं टाळलं पाहिजे. 

रात्री दूध पिण्याचे फायदे

रात्री दूध पिऊन झोपल्याने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे राहते आणि तुम्हाला झोपल्यावर भूक लागत नाही. ज्यामुळे तुमची झोपमोड होत नाही. दूध आपल्या शरीराच्या स्नायूंना रिलॅक्स करतं आणि डोक्यात सुरू असलेले विचार आणि टेन्शन दूर करतं. परिणामी झोप चांगली लागते. तुम्हाला तुमची स्किन हेल्दी ठेवायची असेल तर रात्री दूध पिऊन झोपा. 

रात्री दूध पिण्याचे तोटे :

अशा काही व्यक्ती ज्या लॅक्टोज इन्टॉलरेंटच्या समस्येने त्रस्त आहेत. जर रात्री दूध प्यायल्या तर पोटदुखीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. रात्री दूध प्यायल्याने शरीराची इन्सुलिनची पातळी वाढते. 

हे पण वाचा-

खुशखबर! अमेरिका, ब्रिटनची कोरोना लस २०२० च्या अखेरीस येणार, तज्ज्ञांचा दावा

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात तुम्हालाही सर्दी, खोकला होण्याची भीती वाटते? 'अशी' घ्या काळजी 

Web Title: Health Tips Marathi : Why we should not drink milk on empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.