शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

​शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:09 IST

​शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची प्रकृती ही महत्त्वाची असते. तब्येत खराब असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. आपले आरोग्य तंदुरुस्त कसे ठेवाल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. शरीराची काळजी कशा प्रकारे घ्यावी याच्या टिप्स या ठिकाणी देत आहोत...

जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची प्रकृती ही महत्त्वाची असते. तब्येत खराब असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. आपले आरोग्य तंदुरुस्त कसे ठेवाल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. शरीराची काळजी कशा प्रकारे घ्यावी याच्या टिप्स या ठिकाणी देत आहोत...
पिण्याचे पाणी
दररोज किती पाणी प्यावे हे व्यक्तीसापेक्ष अथवा परिस्थितीनुसार बदलत असते; मात्र तुम्ही योग्य त्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. मानवी शरीरातील सर्वाधिक क्रिया या पाण्यामुळे होत असतात. तुम्हाला नक्की किती पाणी हवे हे सांगता येत नाही. प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर हे अवलंबून आहे. तुम्ही काय काम करता, कुठे राहता, तुमची प्रकृती आणि बाळंतपणावेळी किंवा दूध पाजण्याप्रसंगानुसार ते अवलंबून आहे.
योग्य व्यायाम
उत्तम शरीरासाठी दररोज अथवा टप्प्याटप्प्याने व्यायाम करणे आवश्यक आहे. तुमचे शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. ज्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा, योग्य पचनक्षमता, मनाचा ताजेपणा आणि शरीरातील अवयव याची काळजी घेता येते. व्यायामामुळे चयापचय क्रिया, मेदाचे ज्वलन यावर परिणाम होतो. मानवाच्या रचनेनुसार व्यायाम कसा करावा हे ठरते. भारोत्तोलन, उड्या मारणे, पोहणे असे व्यायाम करावेत.
संतुलित आहार
मानवी शरीरासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आवश्यक प्रमाणानुसार आणि विविध कार्यक्षमतेनुसार आहारात काय असावे हे ठरविले जाते. त्यात प्रथिने, लोह यांचे प्रमाण किती असावे हे सांगितले जाते. ताज्या पालेभाज्या, फळे, मांस यांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे. 
योग्य झोप
तुमचे शरीर तंदुरुस्त असावे यासाठी योग्य प्रमाणात झोप मिळणे गरजेचे आहे. वेळेवर झोप न झाल्यास अनेक आजार उद्भवतात. तुमच्या कार्यक्षमतेत बिघाड होऊ शकतो. वयोमानानुसार तुम्हाला किती झोप हवी हे सांगण्यात येते. लहान मुलाला ८ तास, युवकांना ७ तास आणि वयोवृद्धांना सहा तास झोप आवश्यक आहे. बाळंतपणात इतर वेळेपेक्षा अधिक झोप आवश्यक आहे.
विश्रांती
प्रत्येक मानवी शरीराला विश्रांतीची गरज आहे. मानवी शरीर हे यंत्राप्रमाणे आहे. जर अधिक काम करावे लागले तर याचे संतुलन बिघडते. मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. विश्रांती किती काळ घ्यावी याची वेळ नाही. पण तुमच्या शरीराला ताजेपणा मिळेल इतपत ती असावी. 
मनोरंजनात्मक कार्यक्रम
मानवी मेंदूला आणि शरीराला इतर गोष्टींची गरज असते. तुमचे मन योग्य तºहेने काम करावे आणि त्यावर ताबा असावा या दृष्टीने यांचा उपयोग होतो. तुमचे मन ताजेतवाने करण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतात. यामध्ये सुंदर ठिकाणे, मित्रांशी गाठीभेटी, क्लबना भेटी, सिनेमा यांचा समावेश आहे.
खेळातील सहभाग
मैदानातील आणि मैदानाबाहेरील खेळाचा यशस्वी जीवनात अंतर्भाव गरजेचा आहे. मानसिक आणि शारीरिक श्रमाइतपत कष्ट पडेल इतके खेळ खेळणे आवश्यक आहे. बुद्धिबळ, स्नुकर, कार्ड यामुळे तुमची मानसिक क्षमता वाढते.