​कपिल सिब्बल यांचे बॉलीवूड पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:04 IST2016-06-03T11:30:34+5:302016-06-03T17:04:57+5:30

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे चिन्ह दिसत आहेत.

Kapil Sibal's Bollywood debut | ​कपिल सिब्बल यांचे बॉलीवूड पदार्पण

​कपिल सिब्बल यांचे बॉलीवूड पदार्पण

ँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे चिन्ह दिसत आहेत.  आगामी ‘शोरगुल’ या बॉलीवूड चित्रपटासाठी सिब्बल यांनी गीतलेखन केलं आहे. सलमान खानशी झालेल्या वादानंतर जाहीर माफीनामा मागणारा बॉलीवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंगने हे गीत गायले असून सुप्रसिद्ध झितारवादक निलाद्रीकुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे.

कपिल सिब्बल यांनी सामाजिक आणि राजकीय विषयावरील आधारित ‘शोरगुल’ या सिनेमासाठी ‘तू ही तू’ ही कव्वाली लिहिली होती. मात्र निलाद्री कुमार यांच्यासोबत दुसºया एका प्रोजेक्टवर काम करताना त्यांनी ‘तेरे बिना’ हे आणखी एक गाणं लिहिण्याचं ठरवलं. 
‘तेरे बिना’ हे गाणं  प्रेम व विरह या भावनांचा मेळ घालणारे असून अनेकांच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे तुर्की सुपरमॉडेल सुहा गेझेवर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे.

Web Title: Kapil Sibal's Bollywood debut