सुंदर आणि ग्लोईंग त्वचा सगळ्यांनाच हवी असते. पण रोज कामासाठी बाहेर पडावं लागत असल्यामुळे प्रदुषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्वचेवर मुरूमं, पुटकुळ्या, सुरकुत्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी कशी घ्यायची याबाबत सांगणार आहोत. ताकाचा वापर करून तुम्ही तारुण्य टिकवून ठेवू शकता.

ताकात उत्तम ब्लिचिंग तत्व असतात.लॅक्टिक एसिड असतं. त्यामुळे त्वचेशी जोडलेल्या समस्या दूर होतात. त्यामुळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी फायदा होतो. वाढत्या वयात तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ताकाचा वापर करू शकता. उन्हामुळे त्वचा काळी पडत असते पण ताकाचा वापर करून तुम्ही त्वचा मुलायम आणि चांगली ठेवू शकता.

असा करा वापर

मसुरची डाळ, बेसन, गुलाबपाणी आणि मुलतानी माती हे मिक्षण एकत्र करा. कोणताही स्कीन टाईप असेल तरी या मिश्रणाने फायदा मिळतो. ही पेस्ट त्वचेला लावून २० मिनिटं ठेवा आणि चेहरा धुवून टाका. पपई, टॉमॅटो यांची पेस्ट ताकात मिसळा आणि त्वचेवर लावा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. हा प्रयोग केल्यास सनबर्न निघून जाईल आणि उन्हामुळे त्वचा डॅमेज होणार नाही.

केसांसाठी ताक

केसांतील कोरडेपणा आणि कोंडा साफ करण्यासाठी ताकाचा वापर  उत्तम ठरतो.  कारण ताकात प्रोटिन्स असतात. नैसर्गिकरित्या केसांना सरळ बनवण्याचे काम केले जाते. नारळाच्या दुधात ताक घालून हे मिश्रण एकत्र करा आणि केसांना लावा. एक तास केस सुकू द्या. नंतर केस धुवून टाका.  ( हे पण वाचा- सुट्टीचा फायदा करून सौंदर्य खुलवा,ओठांचा काळपटपणा 'या' सोप्या पद्धतीने घालवा)

केस गळण्यापासून थांबवण्यासाठी आणि केसांना बळकटी येण्यासाठी ताकाचा वापर फायदेशीर ठरेल. तसंच उन्हाळ्यात शरीर चांगलं राहण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी,  त्वचा तजेलदार राहण्यासाठी दुपारच्या जेवणादरम्यान ताकाचं सेवन करा. ( हे पण वाचा- ३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह)

Web Title: How to get glowing skin by using butter milk in summer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.