३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 12:45 PM2020-04-06T12:45:14+5:302020-04-06T12:52:52+5:30

वयाची तीस वर्ष ओलांडल्यानंतर त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण सुरकुत्या यायला सुरूवात झालेली असते. त्वचेच्या रंगात बदल होतो.

Men's Home remedies for glowing and young skin myb | ३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह

३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह

Next

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कमी वयात सुद्धा अनेक पुरूष वयस्कर असल्यासारखे दिसतात. खाण्यापिण्यातील अनियमितता आणि जंक फुड्सं अतिप्रमाणात सेवन यांमुळे त्वचेवर परिणाम दिसून येतो.  महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जे प्रयत्न करतात. तुलनेने पुरुषांकडून तसे प्रयत्न केले जात नाहीत. वयाची तीस वर्ष ओलांडल्यानंतर त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण सुरकुत्या यायला सुरूवात झालेली असते. त्वचेच्या रंगात बदल होतो. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही स्वतःची त्वचा चांगली ठेवू शकता.

स्क्रब

महिलांच्या त्वचेच्या तुलनेत पुरषांची त्वचा खुप तेलकट आणि रफ असते. अशा त्वचेला सॉफ्ट बनवण्याासाठी  स्क्रब करणं गरजेचं आहे. कारण स्क्रब केल्यानंतर त्वेचच्या मृतपेशी निघून जातात. त्याासाठी आठवड्यातून दोनदा स्क्रब करायला हवं.  ग्लोईंग त्वचेसाठी स्क्रब करणं फायदेशीर ठरेल.

टोनर

टोनरचा वापर मुली करत असल्यातरी त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी टोनर फायदेशीर आहे. अनेक मुलांच्या नाकावर, गालावर, हनुवटीच्या भागांवर  बारिक दाणे असातात. ज्यामुळे चेहरा व्यवस्थित दिसत नाही. टोनरचा वापर रात्री झोपण्यापूर्वी केल्यास फरक दिसून येईल. त्यासाठी दिवसातून एकदा त्वचेवर टोनर लावा. 

हेल्दी लाईफस्टाईल

आपल्या बीझी जीवनशैलीचा परिणाम त्वचेवर सुद्धा होत असतो. त्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाहेरचं जास्त प्रमाणात खाल्यामुळे आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळे  चेहरा थकल्यासारखा वाटत असतो. त्यामुळे त्वचा निस्तेज होते.  यावर उपाय म्हणून घरात तयार केलेले पदार्थ खाणे, पॅक फुड न खाणे आणि पुरेशी झोप घेणे हा उपाय आहे. तसंच जास्तीत जास्त पाणी प्या जेणेकरून शरीर डिहायड्रेट होणार नाही. ( हे पण वाचा- पार्लरच्या खर्चाशिवाय सोपे उपाय वापरून नको असलेले केस घरच्याघरीच काढा)

पत्नी किंवा बहिणीच्या सामानाचा वापर

घरातील मुलींच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर अनेकदा मुलं करत असतात. मुलींची त्वचा सॉफ्ट असते. मुलींच्या मेकअपच्या सामानाचा वापर कराल तर फारसा फरक दिसून येणार नाही. त्यासाठी  स्वतःच्या स्किन टोन आणि स्किन टाईपप्रमाणे वेगळ्या क्रिमचा वापर करा. ( हे पण वाचा-सुट्टीचा फायदा करून सौंदर्य खुलवा,ओठांचा काळपटपणा 'या' सोप्या पद्धतीने घालवा)

Web Title: Men's Home remedies for glowing and young skin myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.