सुट्टीचा फायदा करून सौंदर्य खुलवा,ओठांचा काळपटपणा 'या' सोप्या पद्धतीने घालवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:52 PM2020-04-05T17:52:41+5:302020-04-05T17:56:01+5:30

ओठांचा काळपटपणा घालवून गुलाबी ओठ मिळवण्यासाठी काय करायला हवं याबाबत सांगणार आहोत. 

How to remove darkness of the lips by using home remedies myb | सुट्टीचा फायदा करून सौंदर्य खुलवा,ओठांचा काळपटपणा 'या' सोप्या पद्धतीने घालवा

सुट्टीचा फायदा करून सौंदर्य खुलवा,ओठांचा काळपटपणा 'या' सोप्या पद्धतीने घालवा

Next

सध्या लॉकडाऊनचा फायदा घेऊन तुम्ही घरच्याघरी आपल्या आरोग्याकडे आणि त्वचेकडे लक्ष देऊ शकता.  रोज कामासाठी बाहेर जात असलेल्या  अनेक स्त्रिया वेगवेगळ्या ब्रँण्डसच्या लिपस्टिकचा वापर करत असतात त्यामुळे ओठ काळे पडतात. परिणामी मुली या मेकअपशिवाय कुठेही बाहेर जाण्यासाठी विचारसुद्धा करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला ओठांचा काळपटपणा घालवून गुलाबी ओठ मिळवण्यासाठी काय करायला हवं याबाबत सांगणार आहोत. 


लिंबू

त्वचेला उजळ करण्यासाठी लिंबू वापरला जातो, त्याच प्रकारे लिंबू ओठांची सुंदरता वाढवण्यात मदत करतो.  पिळलेला लिंबू सकाळ- संध्याकाळ ओठांवर चोळल्याने काळपटपणा दूर होतो. हा प्रयोग आठवडाभर केल्यास फरक दिसून येईल. लिंबाचा रस  ओठांवर लावल्यावर गुलाबजलाने ओठ स्वच्छ करणे कधीही चांगले. याने ओठांचा रंग कायम राहतो. सोबतच ओठ मुलायम देखील होतात. 

बीट 

बिटामध्ये गडद जांभळ्या रंगाचे घटक आढळतात जे काळपटपणा दूर करण्यात मदत करतं. बीट सहज उपलब्ध होत असल्यामुळे तुम्ही बीटाचा आहारात समावेश करा.  किंवा बीटाचा रस काढून ओठांना लावू शकता.

दुधाची साय

स्वयंपाकघऱातील  दुधाच्या सायीचा  वापर फार पूर्वीपासून ओठांना मुलायम आणि सुंदर करण्यासाठी केला जात होता. मिल्क क्रिममध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि मध मिश्रित करून ओठांवर लावा. काही दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला फायदा बघायला मिळेल. याने ओठांचा काळपटपणा दूर होतो आणि आधीपेक्षा अधिक मुलायम होतात. सोबतच याने ओठांवरील डेड स्कीनही दूर होते. ( हे पण वाचा-पार्लरच्या खर्चाशिवाय सोपे उपाय वापरून नको असलेले केस घरच्याघरीच काढा)

गुलाबाची पानं आणि ग्लिसरीन

गुलाबाची पाने बारीक वाटून त्यात जरा ग्लिसरीन मिसळून द्या, आता हे लेप रात्री झोपताना ओठांवर लावून घ्या, सकाळी उठल्यावर धुऊन टाका. नियमित वापरल्याने ओठांचा रंग गुलाबी आणि चमकदार होतील. हा प्रयोग नियमीत एक आठवडा केल्यास ओठांच्या रंगात फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-मासिक पाळीत आलेल्या पिंपल्समुळे त्वचेचं नुकसान होतं? मग 'या' टिप्सने प्रत्येक महिन्याचं टेंशन घालवा)

Web Title: How to remove darkness of the lips by using home remedies myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.