मासिक पाळीत आलेल्या पिंपल्समुळे त्वचेचं नुकसान होतं? मग 'या' टिप्सने प्रत्येक महिन्याचं टेंशन घालवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 03:09 PM2020-04-03T15:09:58+5:302020-04-03T15:38:06+5:30

मासिक पाळी येण्याची तारीख जवळ आल्यानंतर मुलींना पिंपल्स यायला सुरूवात होते. या दिवसांमध्ये मुलींच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे त्वचेवर इफेक्ट होतो.

या दिवसात त्वचा खूप तेलकट किंवा जास्त कोरडी पडते. आज आम्ही तुम्हाला काही काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता.

मॉईश्चराईजर लावा- मासिक पाळीत एस्ट्रोजन या लेवल कमी झाल्यामुळे कोरडी पडते. तसंच त्वचेवर सुरकुत्या सुद्धा येतात. त्यासाठी या दिवसांमध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं आणि मॉईश्चराईजर लावणं गरजेचं आहे.

स्क्रब करा- त्वचेच्या कोरडेपणापासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे त्वचेवरिल काळे डाग निघून जाण्यास मदत होईल. स्क्रब तयार करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि साखरेचा वापर करू शकता.त्यासाठी साखरेत लिंबू मिसळून त्वचेवर चोळा. असा प्रयोग केल्यास चेहरा खराब होणार नाही.

आहाराकडे लक्ष द्या़- मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी आहार पौष्टिक आणि चांगला घ्या. हिरव्या भाज्या, फळं तसंच ओमेगा ३ असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

मासिक पाळीच्या दिवसात शरीरातून जास्तीत जास्त इस्टोजनचं उत्पादन होत असतं. तसंच त्वचेचं अतिरिक्त तेल सुद्धा येत असतं. त्यामुळे चेहरा नियमितपणे फेसवॉशने धुवा.

पाळी आल्यानंतर त्वचा पिवळी पडत असते. त्यावर सोपा उपाय चंदन, बेसन, हळद आणि दुध या मिश्रणाने मसाज करा.