हेअर ड्रायरचा वापर हेअर स्टाइलसोबतच केस सुकवण्यासाठीही करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सतत केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर केल्याने केस ड्राय होतात. तसेच केसांच्या इतरही समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर केस गळण्याची समस्याही वाढते. त्यामुळे शक्यतो हेअर ड्रायरचा वापर करणं टाळावं. आज आम्ही तुम्हाला हेअर ड्रायरशिवाय केस सुकवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. जाणून घेऊया उपाय... 

हेअर वॉश 

जर केस लवकर सुकावे असं वाटत असेल तर सर्वात आधी केस व्यवस्थित स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक असतं. जर केस व्यवस्थित धुतले नाहीत आणि चिकट राहिले तर मात्र केस लवकर सुकत नाहीत. असं असूनही केस सुकले तरिही तेलकट दिसतात. 

कंडिशनर आणि कोम्ब 

केसांसाठी कंडिशनरचा वापर करा आणि वाइड टूथ कोम्बच्या मदतीने संपूर्ण केसांवर पसरवून घ्या. यामुळे केसांचा गुंता होणार नाही, तसेच ते मुलायम होण्यासही मदत होइल. केसांचा गुंता झाला तर ते लवकर सुकणार नाहीत. त्यामुळे कंडिशनरचा वापर करायला अजिबात विसरू नका. 

टॉवेलचा वापर करा

टॉवेलवर केस ठेवा आणि हलक्या हाताने ते कोरडे करा. पण लक्षात ठेवा की, केस सुकवण्यासाठी अजिबात ताकद वापरू नका. असं केल्याने केस गळण्यास सुरुवात होते. 

सर्वात आधी शॅम्पू

आंघोळ करताना सर्वात आधी शॅम्पूच्या मदतीने केस धुवून घ्या. यामुळे जोपर्यंत तुम्ही बॉडी वॉश कराल तोपर्यंत केसांमधून पाणी वाहून जाईल आणि लगेच सुकून जातात. 

फॅन किंवा कूलर 

हेअर ड्रायरपेक्षा केसांसाठी फॅन किंवा कूलर फायदेशीर ठरतो. त्यामुळे केस ओले असतील तर फॅन किंवा कूलरच्या समोर उभं राहून केस सुकवा. 

ऊन

सर्वात वेगाने केस सुकवण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, थोडा वेळ उन्हामध्ये बसा. केस सुकवण्याची ही सर्वात सोपी पद्धत केसांना कोणतंही नुकसान पोहोचवणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की, जर फार प्रखर ऊन्हामध्ये जाऊ नका. तसेच गेल्यास 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नका. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: How to dry hair quickly without hair dryer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.