घरच्याघरी केवळ २ मिनिटात प्रायमर तयार करून वाचवा पार्लरचा खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 03:33 PM2020-02-18T15:33:59+5:302020-02-18T15:36:26+5:30

पार्लरच्या सारख्या वस्तु घरी आणायचं म्हणजे जबरदस्त खर्च. म्हणून घरच्याघरी सुद्धा प्रायमर बनवता येऊ शकतं

Homemade easy primer tricks you have never heard before | घरच्याघरी केवळ २ मिनिटात प्रायमर तयार करून वाचवा पार्लरचा खर्च!

घरच्याघरी केवळ २ मिनिटात प्रायमर तयार करून वाचवा पार्लरचा खर्च!

googlenewsNext

(Image credit- ravishly)

रेग्युलर लुकपेक्षा वेगळं दिसण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण मेकअप करतो. किंवा पार्लरला जाऊन पैसे घालवून मेकअप करून घेतो. हाच मेकअप घरी करण्यासाठी जास्त पैसै खर्च करून तुम्हाला खूप सामान आणावं लागतं. बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर त्वचेसाठी हानीकारक ठरत असतो. कारण त्यात केमिकल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. 

प्राईमर तयार करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टींची गरज आहे. प्राईमर एका प्रकारचं मेकअपबेस आहे. त्यामुळे तुमचा मेकअप दिर्घकाळपर्यंत टिकून राहण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. पण जर तुम्ही प्रायमर घेण्यासाठी बाजारात गेलात तर त्याची किंमत खूप जास्त असते. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी  प्रायमर कसं तयार करायचं हे सांगणार आहोत. घाबरायचं काही कारण नाही कारण घरच्याघरी जरी बनवायचं असेल तरी जास्तवेळ लागणार नाही.


(image credit- coopcoco.ca)

प्राईमर तयार करण्याची पद्धत 

एलोवेरा ज्यूस किंवा तेल सनस्क्रिन लोशन आणि फाऊंडेशन पावडर किंवा लोशनची आवश्यकता तुम्हाला यासाठी असेल. सगळ्यात आधी एका भांड्यात थोडंस स्नस्क्रिन घ्या. यात काही प्रमाणात एलोवेराचा रस घाला. मग त्यात फाऊंडेशन पावडर घाला. या सगळ्या पदार्थांना एका स्टिकच्या साहाय्याने ढवळून जाड आणि स्मूद पेस्ट  तयार करा.  हे केल्यानंतर  तुमचं प्रायमर तयार होईल.

प्रायमर तयार करण्याची दुसरी पद्धत

काही लोकांच्या त्वचेला एलोवेरा जेल किंवा जूस सुट करत नाही. मग यावर उपाय म्हणून तुम्ही ग्सिसरिनचा वापर करून प्राईमर तयार करू शकता. सगळयात आधी एका बाऊलमध्ये १ चमचा ग्लिसरीन आणि ३ चमचे पाणी घाला. नंतर या मिश्रणात अर्धा चमचा मॉईश्चरायजर घाला. चमच्याने ढवळा नंतर हे मिश्रण पातळ आणि एकत्र झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्य भरा. ( हे पण वाचा-'या' घरगुती उपायांनी नेहमीसाठी दूर होईल डॅंड्रफची कटकट, जाणून घ्या काय आहे उपाय...)

(image credit- allure)

प्राईमरचा वापर त्वचेवर मेकअप लावण्याआधी केला जातो. कारण जर तुम्ही प्राईमर शिवाय मेकअप केलात तर त्वचा कोरडी आणि मेकअप फाटल्यासारखा आणि पसरल्यासारखा दिसत  असतो.  प्राईमरमुळे त्वचेवर मेकअप त्वचेवर चांगला टिकून राहतो. फाईन लाईन्स आणि सुरकुत्या लपवण्यासाठी सुद्धा प्रायमर महत्वाचं असतं. (हे पण वाचा-त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी 'असा' वापरा बटाटा, मग बघा कमाल!)

Web Title: Homemade easy primer tricks you have never heard before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.