केसांमध्ये डॅंड्रफची म्हणजेच कोंड्याची समस्या होणे ही एक सामान्य बाब आहे. याची कारणेही वेगवेगळी असतात. पण जास्तकरून डोक्याच्या त्वचेला योग्य पोषण न मिळाल्याने त्वचा निर्जिव होऊ लागते आणि मृत त्वचा तयार होते. हे पुढे डॅंड्रफ होतात. ज्याप्रमाणे त्वचेवरील डेड स्क्रीन म्हणजेच मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रबिंग, क्लेजिंग आणि मॉइश्चरायजिंग करण्याची गरज असते. तशीच डोक्याच्या केसांमधील डॅंड्रफ दूर करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला डॅंड्रफ दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

१) एक चमचा गमर कॅस्टर ऑइलमध्ये एक चमचा कोकोनट ऑइल, एक चमचा तिळाचं तेल आणि दोन-तीन थेंब सेडर वुड ऑइलचे मिश्रित करा. तेलांचं हे मिश्रण डोक्याच्या त्वचेला आणि केसांना लावा. अर्ध्या तासाने शॅम्पूने केस धुवावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. उन्हाळ्यात एकदाच हा उपाय करा.

(Image Credit : healthline.com)

२) दोन चमचे दह्यात अर्धा लिंबाचा रस आणि दोन थेंब सेडर वुड ऑइल टाका. नंतर त्यात दोन चमचे उडीदाची डाळ बारीक करून त्यात टाका आणि हे मिश्रण डोक्याला लावा. दहा मिनिटांनंतर हर्बल शॅम्पूने केस धुवावे. आठवड्यातून कमीत कमी एकदा हा उपाय करावा. या उपायानंतरही डॅंड्रफ जात नसतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे फंगल इन्फेक्शनचं कारणही असू शकतं.

३) आलमंड ऑइलमध्ये गुलाबजल मिश्रित करून डोक्याच्या त्वचेवर लावा. हे मिश्रण लावून जरावेळी मालिश करा. नंतर अर्ध्या तासाने केस धुवावे.

(Image Credit : wikihow.com)

४) एक चमचा जोजोबा ऑइल, एक चमचा कॅस्टर ऑइल, एक चमचा सोया व्हेजिटेबल ऑइल आणि यात एक तेजपत्ता टाकून गरम करा. नंतर हे गाळून त्यात दोन थेंब सॅंडलवुड ऑइल आणि दोन थेंब लॅवेंडर ऑइल टाका. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोक्याची या तेलाने मालिश करा. सकाळी केस शॅम्पूने धुवावे.

(Image Credit : amazon.in)

५) एक ग्लास पाण्यात एक तेजपत्ता टाकून थोडा वेळ पाणी उकडू द्या. नंतर हे पाणी गाळून त्यात दोन थेंब लॅवेंडर ऑइल आणि दोन थेंब लिंबाचा रस मिश्रित करा. रोज हे मिश्रण लावून डोक्याची मालिश करा आणि दुसऱ्या दिवशी केस धुवावे.


English summary :
To effectively and permanently get rid of dandruff, you need to simply turn to your kitchen. Home Remedies for Dandruff.

Web Title: Know the home remedies to get rid of dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.