सगळ्यांच्या घरात बटाटा असतोच. वेगवेगळया पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. अनेकांना त्वचेच्या संबंधित समस्या जाणवत असतात. काही महिला सगळ्या क्रिम वापरून थकलेल्या असतात. पण चेहरा आणि मानेचा काळपटपणा जात नाही किंवा त्वचा ग्लोईंग सुद्धा दिसत नाही.  तुम्ही सुद्धा रोजचं जीवन जगत असताना पिंपल्स, सुरकुत्या आणि डागांनी हैराण झाला असाल तर एक शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही घरगुती वापरात असलेल्या बटाट्याचा वापर करून आपली त्वचा सुंदर बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया बटाट्याच्या रसाचा वापर करून तुम्ही चांगली त्वचा कशी मिळवू शकता. 

5 Ways To Use Potato As A Beauty Product | चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर

एक्ने, काळे डाग

(image credit-medical news today)

बटाट्याच्या सालीला वाटून त्वचेवर काहीवेळ मसाज हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा साफ होण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.अर्ध्या बटाट्याच्या रसात  एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून मिश्रण बनवून घ्या. चेहरा आणि मानेवर अर्धा तास लावून ठेवा.  काहीवेळानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्यामुळे त्वेचवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.

त्वचेचे तारूण्य टिकवण्यासाठी

(image credit- be beatiful)

अर्ध्या बटाट्यात दोन चमचे दूध मिसळून मिश्रण तयार करा. त्यानंतर चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावा. नंतर  अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते, त्वचेतील घाण निघून जाते. १०-१५ दिवस बटाट्याचा रसाचा वापर केल्याने नक्कीच आराम मिळेल.

काळपटपणा घालवण्यासाठी

(image credit- enjoy the journey)

बटाट्याची साल काढून तुकड्यांमध्ये कापून घ्या आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटांसाठी मालिश करा. असं केल्याने हळूहळू स्किन टोन लाइट होतो. बटाट्याचा रस करून तो रस संपूर्ण त्वचेला लावल्यानंतर सुद्धा टॅनिंग कमी होत असतं. 

डोळ्यांखालची काळे डाग दूर होतात

(image credit-healthlove)

सध्याच्या काळाच ताण-तणावामुळे डोळ्यांच्या खाली वर्तुळ येत असतात. त्यामुळे अनेक स्त्रिया या वयापेक्षा जास्त मोठ्या दिसतात.  डोळ्यांखाली सूज व काळी वर्तुळे असल्यास ताज्या बनवलेल्या बटाट्याच्या रसात कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा. असे रोज केल्यास सूज व काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.( हे पण वाचा-'हे' गैरसमज आधीच माहिती असतील तर केसांच्या समस्या वेळीच टाळता येतील!)

असा तयार करा पॅक

बटाट्यापासून तयार केलेला हा पॅक स्किन ग्लो वाढवण्यासाठी मदत करतो. तसेच हा डाग दूर करण्यासोबतच सूज कमी करण्यासाठीही मदत करतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी बटाट्याती साल न काढता पेस्ट तयार करा. त्यामध्ये ३  ते ४ चमचे मुलतानी माती आणि काही थेंब गुलाबाचे पाणी एकत्र करा. तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि ३० मिनिटांनतर चेहरा धुवून टाका. हा फेस पॅक काही दिवस नियमितपणे लावल्याने स्किन ग्लो करण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-'या' घरगुती उपायांनी नेहमीसाठी दूर होईल डॅंड्रफची कटकट, जाणून घ्या काय आहे उपाय...)

Web Title: Benefits of potato for healthy and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.