केस गळतीसह वेळेआधी पडलेलं टक्कल घालवण्यासाठी फायदेशीर ठरेल हा मास्क; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 05:13 PM2021-01-28T17:13:30+5:302021-01-28T17:23:22+5:30

मेथीच्या हेअर मास्कने केसांना कोणकोणते फायदे मिळतात याबाबत सांगणार आहोत. 

Fenugreek hair mask for hair fall control know its recipe | केस गळतीसह वेळेआधी पडलेलं टक्कल घालवण्यासाठी फायदेशीर ठरेल हा मास्क; जाणून घ्या फायदे

केस गळतीसह वेळेआधी पडलेलं टक्कल घालवण्यासाठी फायदेशीर ठरेल हा मास्क; जाणून घ्या फायदे

googlenewsNext

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मेथीचे सेवन केले जाते. मेथीत अनेक औषधी गुणधर्म असतात. मेथीचे दाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे केसांसाठीही लाभदायक ठरतात. केसांना नेहमी सुंदर ठेवण्यासाठी हेअरमास्क लावण गरजेचं आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना गळणाऱ्या केसांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाल मेथीच्या हेअर मास्कने केसांना कोणकोणते फायदे मिळतात याबाबत सांगणार आहोत. 

केस पातळ होणं, कोरडे होणं, कोंडा होणं यांसारख्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांचे उपाय मेथी दाण्यात आहेत. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केस नैसर्गिकपणे सुंदर करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो. त्यात फोलिक अ‍ॅसिड, अ, के आणि क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशिअम, कॅल्शियम, लोह यासारखी खनिजंही मेथी दाण्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. 

या गुणांमुळेच मेथी जर केसांसाठी वापरली तर केसांचा कोरडेपणा, कोंडा यासारख्या समस्या सुटतात. मेथी दाण्यांत मोठ्या प्रमाणात लेसिथिन नावाचा घटक असतो ज्यामुळे केस कोरडे होत नाही. केसांची मुळं मेथीमुळे पक्की होतात. याशिवाय प्रोटिन, निकोटिनिक अ‍ॅसिड असतं याचा उपयोग केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो.

काळ्याभोर आणि मऊसूत केसांसाठी

दोन चमचे मेथी मिक्सरमध्ये वाटाव्यात. मेथीच्या पूडमध्ये एक चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल घालावं. ती पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी. नंतर ती केसांना लावावी. दहा मिनिटं ती केसांवर तशीच राहू द्यावी. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. हा उपचार नियमित केल्यास केस उत्तम राहतात. घरच्याघरी सहज करुन पहावेत असे हे सोपे उपाय आहेत. केसांसाठी पोषक आणि उत्तमही ठरतात. हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर

असा तयार कर हेअर मास्क

मेथीचा हेअर मास्क  तयार करण्यासाठी सगळ्यात आधी ५ चमचे मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर  हे  दाणे बारिक करून घ्या हे दाणे बारिक केल्यानंतर त्याची पेस्ट केसांना लावा. ४० मिनिटं केस असेच ठेवा. केस धुण्याआधी हलक्या हातानं केसांच्या मुळाशी मसाज करावा आणि सौम्य शाम्पूनं केस धुवा. जर केसात कोंडा असेल तर या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा. या पेस्टमुळे कोंडा जातो. केस मऊ हवे असतील तर या पेस्टमध्ये १ चमचा नारळाचं दूध घालावं. या मास्कमुळे केस गळणं थांबवण्यास मदत होते. लूक बिघवणाऱ्या डेड सेल्सना चेहऱ्यावरून कसं घालवाल? घरच्याघरी तांदळाच्या पाण्याने समस्या होईल दूर

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Fenugreek hair mask for hair fall control know its recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.