(Image Credit : earth911.com)

थंडीच्या दिवसात अनेक लोक पाण्यापासून दूर राहणंच पसंत करतात आणि सर्वातआधी आंघोळ करणं बंद करतात. आता जर तुम्ही दोन ते तीन दिवस आंघोळ केलीच नाही तर अर्थातच शरीराचा घामाचा वास येणार. मग अनेकजण यावर उपाय म्हणून डिओड्रन्टचा वापर करतात. अनेक लोक असे आहेत जे हिवाळ्यात आंघोळ करण्याऐवजी डिओने काम भागवतात. पण अशाप्रकारे डिओचा अधिक वापर करणं आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

लाल चट्टे, इरिटेशन आणि खास

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, डिओड्रन्ट आणि घामाचा वास दूर करणारे अ‍ॅंटीपर्सपिरेंट्समध्ये एन्ग्रीडिएंट आपल्या शरीराला आणि त्वचेला नुकसान पोहोचवतात. डिओमध्ये असलेलं अल्कोहोलमुळे त्वचेवर लाल चट्टे आणि इरिटेशन होऊ लागतं. ज्यामुळे खाज आणि पिग्मेंटेशनची समस्याही होऊ लागते.

घामाच्या ग्रंथी होऊ शकतात ब्लॉक

(Image Credit : botanicadayspa.com)

डिओड्रन्ट आणि अ‍ॅंटीपर्सपिरेंट्समध्ये असलेल्या अ‍ॅंल्युमिनियम कंपाउंड्समुळे स्वेट ग्लॅन्ड्स म्हणजे घामाच्या ग्रंथी ब्लॉक होतात. ज्यामुळे घाम शरीराबाहेर निघणं बंद होतं आणि याने त्वचेच्या वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात. घामाच्या ग्रंथीमध्ये काही समस्या आल्यास शरीरातील टॉक्सिन्स आणि नुकसानकारक तत्व बाहेर येत नाहीत. हे शरीरासाठी चांगलं नसतं.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

तज्ज्ञ सांगतात की, डिओड्रन्टमध्ये असलेल्या अ‍ॅल्युमिनियम आणि पॅराबीन्ससारख्या तत्वांमुळे ब्रेस्ट टीश्यूंचं नुकसान होतं. ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. जर कुणाच्या परिवारात ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर त्यांनी डिओ किंवा परफ्यूम वापरू नये. 

स्प्रे ऐवजी डिओ स्टिक

(Image Credit : foxnews.com)

तज्ज्ञांनुसार त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या टाळण्यासाठी स्प्रे ऐवजी डिओड्रन्ट स्टिकचा वापर करावा. जास्त वेळ सुगंध रहावा म्हणून डिओड्रन्ट स्प्रेमध्ये जास्त केमिकल मिश्रित केलं जातं. त्यामुळे याने त्वचेचं जास्त नुकसान होतं. पण स्टिकचं असं नाही. डिओ स्टिक ही माइल्ड केमिकलने तयार केली जाते. त्यामुळे याने त्वचेला नुकसान होत नाही.


Web Title: Excess use of deodorants is bad for your skin and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.