वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्यात बदल होतोय? मग, करा असे उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 18:43 IST2019-02-07T18:42:37+5:302019-02-07T18:43:19+5:30
वाढत्या वयासोबतच चेहऱ्याच्या त्वचेमध्ये बदल घडून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. तसेच त्वचा हळूहळू निस्तेज दिसू लागते. चेहऱ्याच्या त्वचेमध्ये घडून येणाऱ्या सततच्या बदलांमुळे अनेक महिला त्रस्त असतात

वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्यात बदल होतोय? मग, करा असे उपाय...
वाढत्या वयासोबतच चेहऱ्याच्या त्वचेमध्ये बदल घडून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. तसेच त्वचा हळूहळू निस्तेज दिसू लागते. चेहऱ्याच्या त्वचेमध्ये घडून येणाऱ्या सततच्या बदलांमुळे अनेक महिला त्रस्त असतात. बाजारात वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स असतात. परंतु या प्रोडक्ट्सचा वापर केल्यानंतरही काही फायदा होत नाही. अनेकदा तर या प्रोडक्ट्समध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्समुळे त्वचेला इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का? काही आयुर्वेदिक उपाय असे आहेत, जे चेहऱ्याच्या त्वचेचं तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. आम्ही आज काही असे उपाय सांगणार आहोत, जे चेहऱ्याचं सौंदर्य आणि तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.
उन्हामध्ये गेल्यामुळे त्वचेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी
सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज झाली आहे का? तर त्यासाठी बेसनचा वापर फायदेशीर ठरतो. याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डागांसोबतच निस्तेज झालेली त्वचा तजेलदार होण्यासही मदत होते.
ऑयली स्किन असेल तर 'हे' करा
जर तुमची स्किन ऑयली असेल तर नॉर्मल करण्यासाठी बेसनमध्ये गुलाब पाणी एकत्र करून एक पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून एका तासासाठी ठेवा. त्यामुळे ऑयली स्किनचा प्रॉब्लेम दूर होतो.
ड्राई स्किन असेल तर 'हे' उपाय करा
ड्राय स्किनमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा तर इन्फेक्शनही होतं. ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी बेसनमध्ये दूधाची मलई, मध आणि एक चिमुटभर हळद एकत्र करा. तयार मिश्रण त्वचेवर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
पोर्स स्वच्छ करण्यासाठी 'हे' करा
अनेकदा प्रदूषण किंवा दिवसभर बाहेर असल्यामुळे त्वचेवर घाण जमा होते. जी त्वचेच्या पोर्समध्ये जाऊन जमा होते. त्वचेच्या पोर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठी बेसनमध्ये थोडा काकडीचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. आता हे चेहऱ्यावर लावा. मिश्रण सुकल्यानंतर हलक्या कोमट पाण्याने धुवून टाका.