शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

केवळ अपुरी झोप नाही तर 'ही' आहेत डोळ्याखाली काळे डाग येण्याची कारणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:17 AM

Dark Circles Removal Tips : डार्क सर्कलचा विषय निघाला की, सहजपणे कुणीही झोप झाली नसेल किंवा पूर्ण झोप घेत जा असा सल्ला देतात.

डार्क सर्कलचा विषय निघाला की, सहजपणे कुणीही झोप झाली नसेल किंवा पूर्ण झोप घेत जा असा सल्ला देतात. म्हणजे काय तर डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याचं मुख्य कारण हे पुरेशी झोप न घेणे हेच अनेकजण समजतात. अनेकदा डोळ्याखालच्या त्वचेचा रंग हा डार्क होतो. पण याला केवळ झोप न घेणे हेच कारण नाही. अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही डार्क सर्कल्स येतात. चला जाणून घेऊ डार्क सर्कलची कारणे....

व्हिटॅमिन ए ची कमतरता

व्हिटॅमिन ए त्वचेसाठी अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखं काम करतं. त्यामुळे या व्हिटॅमिनचा नियमित आहारात समावेश करायला हवा. कारण व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डार्क सर्कलची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेचं तारूण्य वाढतं आणि ब्लड सर्कुलेशनही योग्य प्रकारे होतं. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात.  त्यामुळे डाएटमध्ये गाजर, कलिंगड, पपई यांसारख्या फळांचा समावेश करावा.

व्हिटॅमिन सी ची कमतरता

अनेकदा या फायदेशीर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी हेल्दी आणि त्वचेला निरोगी ठेवण्याचं महत्वाचं व्हिटॅमिन आहे. याच्या सेवनाने नसा मजबूत होतात. तसेच त्वचा लवचिक होतो आणि डोळ्यांखालील त्वचेवर आलेली सूजही दूर  होते.

त्यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर करायची असेल तर वेगवेगळ्या फळांसोबतच हिरव्या पालेभाज्यांचंही सेवन करावं. त्यात संत्री, लिंबू, फ्लॉवर, ब्रोकली यांचा समावेश करावा. यातून तुम्हाला भरपूरप प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल.

काय आहे उपाय?

रोज कमीत कमी ८ तासांची झोप

दिवसा घराबाहेर पडताना सन ग्लासेस वापरणे

जर डोळ्यांच्या आजूबाजूला काळे डाग असतील तर कच्च्या बटाट्याची किंवा काकडीची पेस्ट लावा

चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा

व्हिटॅमिन सी, के आणि व्हिटॅमिन इ असलेले क्रीम यासाठी वापरु शकता.

पोषक आहार

आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे तरुण असतानाच डोळ्यांच्या चारही बाजूने बारीक रेषा दिसू लागतात. हसताना किंवा जांभई देताना त्वचेवर ताण पडतो. क्रॅश डायटिंग याचं प्रमुख कारण आहे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर याने त्वचा आकुंचन पावतात आणि सुरकुत्या वाढतात. त्यामुळे पोषक आहार घेणे यासाठी फार महत्वाचे आहे. 

अशात दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. ताजी फळे, ज्यूस, ताक, लिंबू पाणी आणि लस्सीचे सेवन करावे. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. क्रॅश डायटिंग टाळा कारण याने वजन कमी झाल्यावर त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय