शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

​आज साजरा करा हेल्दी व्हॅलेंटाईन डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:52 IST

जोडीदाराच्या आरोग्यासाठी जर तुम्ही काही करू शकले तर तो बेस्ट व्हॅलेंटाईन डे होईल.


आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे वातावारणात गुलाबीपणा आपोआप जाणवतोय. मागच्या सात दिवसापासून या दिवसाचे प्लॅनिंग सुरू असेल. आपल्या ‘स्पेशल समवन’साठी काही तरी खास करण्याचा तुमचा जर बेत असेल तर हेल्दी व्हॅलेंटाईन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कपडे, ग्रीटिंग्स, फु लं, परफ्युम असे गिफ्ट तर आता फार कॉमन झाले आहेत. जोडीदाराच्या आरोग्यासाठी जर तुम्ही काही करू शकले तर तो बेस्ट व्हॅलेंटाईन डे होईल.

1. हेल्दी नाश्ता
सकाळी बे्रकफास्टमध्ये फास्टफुड किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा जोडीदाराला स्ट्रॉबेरी म्युस्ली आणि मलाईरहित दुधाचा आरोग्याला अतिलाभदायक नाश्ता देऊन सरप्राईज करा किंवा ओट्स, गव्हाचे पोहे, स्ट्रॉबेरी, मक्याचे पोहे असा कमी कॅलरी आणि चवीला रुचकर नाश्त्याने दिवसाची सुरुवात करु शकता.

2. ग्रीन टी आणि जॅस्मिन
अनेक जण १४ फेब्रुवारीला यादगार करण्यासाठी विविध कॉकटेलचे नियोजन करत असतील. परंतु तुमच्या प्रेमाला हेल्दी टच देण्यासाठी ग्रीन टी आणि जॅस्मिन सर्वोत्तम मार्ग आहे. दुपारच्या वेळी जोडीदाराचा हात हातात घेऊन मस्त आरामशीर ग्रीन टीचे घोट घेत रोमॅण्टिक गप्पा मारण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते?

3. आॅलिव्ह आॅईल डिनर
प्रेम म्हणजे एकमेकांच्या हृदयाशी केलेला संवाद असतो. त्यामुळे हृदयाची काळजी तर घेतलीच पाहिजे. जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी व्हेलेंटाईन डे रोजी डिनर लाईट आॅलिव्ह आॅईलमध्ये तयार करा. रोजच्या तेलापेक्षा वेगळा स्वाद आणि आॅलिव्ह आॅईलमध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असा दुहेरी लाभ शक्य आहे.

4. मधाचा गोडवा
व्हॅलेंटाईन डे चॉकलेटशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मात्र, चॉक लेट किंवा इतर गोड पदार्थांमध्ये वापरण्यात येणारी साखर आपल्या आरोग्यासाठी फार अपायकारक आहे. त्यामुळे गोड खाद्यपदार्थांमध्ये प्रोसेस्ड शुगर किंवा चॉकलेट ऐवजी मध वापरावा. प्रेमाचा गोडवा तर टिकूनच राहिल, त्यासोबतच आरोग्यही सुधारेल.